Ahmednagar Dandiya | क्रिएटर डान्स अॅकॅडमीच्या वतीने आयोजित बॉलीवूड दांडिया नाईट मध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद
Ahmednagar Dandiya | क्रिएटर डान्स अॅकॅडमीच्या वतीने आयोजित बॉलीवूड दांडिया नाईट मध्ये महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद
अहमदनगर । दर्शक
शारदीय नवरात्री उत्सवाच्या औचित्याने क्रिएटर डान्स अकॅडमी, ड्रेपरी व झुंबा फिटनेस च्या वतीने बंधन लॉन्स येथे बॉलीवूड दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नगर शहरातील 5000 महिला सहभागी होऊन या दांडिया नाईट ला उस्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच यावेळी बेटी बचाव... बेटी पढाव.. चा संदेश देखील देण्यात आला. हा बॉलीवूड दांडिया नाईट फक्त लडक्या बहिणींसाठी आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अॅड.धनंजय जाधव, सौ.शितल संग्राम जगताप, डीवाय एसपी अमोल भारती, संचालक दिनेश फिरके, संपादक पाटील साहेब, कोरिओग्राफर किरीट पाठक, फोटोग्राफर पार्टनर अक्षय भोकरे, एपीएसचे प्रिन्सिपल एकता सिंग, एसआरईएफचे मुख्याध्यापक जेऊरकर, केसर स्कूलचे प्रिन्सिपल काजल केसर, ब्रह्मकुमारी सुषमा दीदी, माजी सभापती आरती भुजबळ, दीनानाथ जाधव, चेतन जाधव, सोमनाथ जाधव, प्रियंका चिखले, झिनझुंबाचे शरण भोगल फिरके उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे अॅड.धनंजय जाधव म्हणाले कि, महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम दिनेश फिरके यांनी केले. सर्वांनी या बॉलीवूड दांडिया नाईट कार्यक्रमाचे कौतुक केले आणि सर्वांनी आनंद लुटला.
यावेळी क्रिएटर डान्स अॅकॅडमीचे संचालक दिनेश फिरके म्हणाले, महिलांना एक हक्काचा व्यासपीठ मिळावा या हेतूने हा बॉलीवूड दांडिया नाईट चे आयोजन करण्यात आले. वास्तविक, नवरात्रीमध्ये गरबा आणि दांडियाला खूप महत्त्व आहे, म्हणून क्रिएटर डान्स अॅकॅडमी व झुंबा फिटनेसच्यावतीने 7 वर्षांपासून नवरात्रमध्ये बंधन लॉन्स येथे हा कार्यक्रम घेण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे नियोजन भव्य दिव्य स्वरूपात करण्यात आले होते. यामध्ये बॉलीवूड दांडिया कार्यक्रमात गारबाचे नृत्य, दांडिया व झुंबा असे अनेक सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये क्रिएटर डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी डान्स चे सादरीकरण केले. त्याचबरोबर अकॅडमी द्वारे आयोजित गरबा वर्कशॉप मधील महिलांनी गरबा सादरीकरण केले. झुंबा फिटनेसच्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी झुंबाजी सादरीकरण केले.
या कार्यक्रमासाठी शरण झुंबा फिटनेस, क्रिएटर्स ड्रेपरी, कृष्णा एझोटिका, बंधन लॉन, कॅफे आर्बन व्हीलेज, हॉटेल नगरी व्हिलेज, राहुल मुथा, सोनु बोरुडे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रियंका यांनी केले. तर आभार शरण भोगल यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com