अहमदनगर महाविद्यालय आयोजित ‘महात्मा गांधी यांचे जीवन आणि कार्य’ या विचारांवर निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण
नगर : दर्शक ।
महाविद्यालयातील महात्मा गांधी अभ्यास केंद्राचे उपक्रम कौतुकास्पद आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी व त्याचे व्यक्तिमत्व अधिकाधिक चांगले निर्माण होण्यासाठी महात्मा गांधी सारख्या महापुरुषांवरील निबंध स्पर्धा उपयुक्त ठरते. महाविद्यालयीन निबंध स्पर्धेमुळे युवक वर्गात मूल्यांची जडणघडण अधिक चांगली होत आहे. निबंध स्पर्धेतील प्रमाणपत्र विद्यार्थी जीवनात मूल्यांची जडणघडण होण्यास अधिक महत्त्वपूर्ण ठरते, असे प्रतिपादन डॉ. रज्जाक सय्यद यांनी केले.
गांधी अभ्यास केंद्र आणि राज्यशास्त्र विभागाच्या वतीने महात्मा गांधी यांचे जीवन आणि कार्य या विचारांवर आधारित महाविद्यालय स्तरावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. या निबंध स्पर्धेमध्ये कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयातील तीनही विद्याशाखा मधील विद्यार्थी व विद्यार्थिनीनि उस्फूर्तरीत्या सहभाग घेतला.सर्व विजयी स्पर्धकांना अहमदनगर महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप कुमार भालसिंग आणि विनाअनुदानित विभागाचे मुख्य समन्वयक डॉ. रज्जाक सय्यद यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
निबंध स्पर्धेतील निकाल पुढील प्रमाणे :- अनुक्रमे कनिष्ठ महाविद्यालय गट प्रथम क्रमांक कु.साळवे प्रीती सुधीर, द्वितीय कु.गर्देशर्वरी दिगंबर आणि तृतीय क्रमांक कु.बेरड ऋतुजा मनेश्वर व कु.बोंबले सायली दत्तात्रय यांना विभागून देण्यात आले. तर वरिष्ठ महाविद्यालयात पदवी मराठी माध्यम गटामध्ये प्रथम क्रमांक शेख आयशा, द्वितीय क्रमांक कुमारी पारगे साक्षी आणि तृतीय क्रमांक मस्के त्रिवेणी व गायकवाड श्रद्धा यांना विभागून देण्यात आला.
उत्तेजनार्थ बक्षीस खोमणे स्वरूपा यांना विभागून देण्यात आले. महाविद्यालय पदवी इंग्रजी माध्यम गटांमध्ये प्रथम क्रमांक कुमारी रिद्धी पाठवा, द्वितीय क्रमांक कु.शिंदे राधिका बालू व भोसले साक्षी यांना विभागून देण्यात आले. तर तृतीय क्रमांक रूपाली मीना आणि परदेशी काशी यांना विभागून देण्यात आला. तर उत्तेजणार्थ बक्षीस शेख शाखा आणि कुं.खान शिफा व करण नागपुरे यांना देण्यात आले. महाविद्यालयीन पदवीत्तर गटामध्ये कु.हजारे अपूर्वा प्रथम क्रमांक आणि भिसे प्रीती द्वितीय क्रमांक असे बक्षीस देण्यात आले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप कुमार भालसिंग यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख सुधीर वाडेकर उपस्थित होते. तसेच महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ नोवेल पारगे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रा. सचिन बोरूडे पूनम घोडके, अजय बनसोडे ,डॉ भास्कर कसोटे कु. आकांक्षा नवले सह मोठ्या सहभागी प्रमाणात विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. शेवटी गांधी अभ्यास केंद्राचे समन्वयक प्रा. विलास नाबदे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
--------
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com