Abhiwadan | चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक विकसित करावे - आसिफ खान

 अहमदनगर इतिहास प्रेमीमंडळातर्फे चौथे शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन

कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासारखे चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक विकसित करावे - आसिफ खान

चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक विकसित करावे - आसिफ खान


नगर - भारताच्या स्वतंत्र्यात चौथे छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे योगदान होते. त्याची दखल महाराष्ट्र सरकारने येऊन हे तीर्थस्थळ म्हणून घोषित करावे. भारतीय स्वतंत्रय आंदोलनात तीन छत्रपती हुतात्मा झाले. याचाही एक वेगळा इतिहास आहे. तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. व कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधी स्थळासारखे चौथी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक विकसित व्हायला हवे असे अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान यांनी सांगितले. 


गेली 141 वर्षे सदर समाधी ही ऊन पावसात असून त्याची झीज होत आहे. तरी त्यावर मेघडबरी करावे अशी मागणी अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे आसिफ खान यांनी सांगितले. 


5 एप्रिल चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 162 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळातर्फे चौथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे त्यांच्या पुतळ्यास व समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


 याप्रसंगी अहमदनगर इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष आसिफ दुलेखान, भैरवनाथ वाकळे, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, संध्याताई मेढे, पंकज गुंदेचा, रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनिसभाई तांबटकर, यशवंत तोडमल, रेणुल नागवडे, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दूल्हेखान, सय्यद शफकत, खुशी राजभर आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या