Collector Office | महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे आक्रोश निदर्शने

 Collector Office |  विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेध आक्रोश निदर्शने

Collector Office | महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे आक्रोश निदर्शने







नगर - महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना (र. न.२९३४/८४) आर.एन.सोनार राज्याध्यक्ष आणि डी.एस.पवार, राज्य सरचिटणीस यांचे नेतृत्वाखाली 9 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आक्रोश निदर्शने आंदोलन करण्यात आले.

     यामध्ये राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम आणि त्या अंतर्गत असलेले प्रशासकीय कामकाजाचे नियंत्रण जिल्हा परिषद यंत्रणेकडे सोपवण्याचे २२ नोव्हेंबर २०१९ चे शासन परिपत्रकावरील ६ वषांपूवी स्थगित झालेली कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचे निर्णय तात्काळ थांबविण्यात यावे.

 बायोमेट्रिक फेस रीडिंग चे अंमलबजावणीस अडचणी येत असल्याने आणि शासनाने तशी सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याने त्यावरील कार्यवाही त्वरित स्थगित करण्यात यावी या मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीने लक्षवेधी आक्रोश निदर्शने आंदोलन करण्यात आले. या मागण्या लवकरच मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा आंदोलनकत्यांनी दिला आहे.

    यावेळी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत हिवताप विभागाचे जिल्हा परिषदेकडे होणारे हस्तांतरण त्वरीत थांबविण्यात यावे याबाबत निवेदन देण्यात आले.

       यावेळी जिल्हा हिवताप कर्मचारी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष किसन भिंगारदिवे, सरचिटणीस पुरुषोत्तम आडेप, कैलास ढगे, प्रसाद टकले, अरुण लांडे, गणेश महाजन, संजय नरवडे, सुनील मुंगसे, नितीन नेवासकर, सागर गायकवाड,अर्जुन वाघमोडे,  तसेच महिला प्रतिनिधी शोभा अहिरवाडी, अश्विनी गायकवाड, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, भाऊसाहेब डमाळे, अशोक मासाळ यांसह संघटनेचे पदाधिकारी, जिल्ह्यातील कर्मचारी, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या