Dr Paulbudhe School | डॉ.पाउलबुधे विद्यालयातील खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर । दर्शक :
खो-खो हा पारंपारिक भारतीय मैदानी खेळ आहे. कोणत्याही साधनांशिवाय खेळला जाणारा हा खेळ दोन संघाव्दारे खेळला जातो. खो-खो खेळामुळे शालेय मुलांच्या सामाजिक व मानसिक विकासास मदत होते शिवाय खेळाडूंची क्षमता वाढते. तुमची सोलापूर येथे होणार्या स्पर्धेसाठी झालेली निवड सेवा शिक्षण प्रसारक मंडळासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे प्रतिपादन मंडळाचे संचालक विलास जगधने यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे माध्यमिक विद्यालयातील 17 वर्षेमुले व मुलींच्या खो-खो संघाची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. या सर्वांना संस्थेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी संचालक विलास जगधने, खजिनदार दादासाहेब भोईटे, प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, प्राचार्य भरत बिडवे, जेष्ठशिक्षिका आशा गावडे, मुलांच्या खो-खो संघाचे व्यवस्थापक विनायक सापा, मुलींंच्या संघ व्यवस्थापक सविता वाळके, स्पर्धेसाठी निवड झालेले विद्यार्थी उपस्थित होते.
संचालक जगधने साहेब यांनी सांगितले की, पाउलबुधे शाळेतील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात आपले कला कौशल्य दाखवून यशाची भरारी घेत आहेत. विविध परिक्षेमध्ये सांस्कृतिक, कला, क्रिडा स्पर्धेत शाळेचे नाव उंचावले यांचा आम्हाला आनंद वाटतो.
दादासाहेब भोईटे म्हणाले नगर महानगर पालिकेच्या अंतर्गत जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत आपल्या शाळेने प्रथम क्रमांक मिळविला. त्यामुळेच पुणे विभागीय स्पर्धेत आपले खो-खो चे विद्यार्थी निवडले. आता विभागीय स्पर्धेत चांगली कामगिरी करुन मोठे पदक मिळवा असे सांगितले.
प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा म्हणाल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीबरोबरच, कला-क्रिडा क्षेत्रातही चांगली कामगिरी विद्यार्थी करीत आहेत. संस्था त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करीत असते. सोलापूर येथे 10 व 11 ऑक्टोबर रोजी होणार्या स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.
या सर्व विद्यार्थ्यांना खो-खो संघाचे व्यवस्थापक तसेच मार्गदर्शक नरेंद्र गोपाळ यांचे सहकार्य मिळाले. प्राचार्य भरत बिडवे यांनी सर्वांचे आभार मानले. सर्व स्पर्धकांना सोलापूर येथे होणार्या स्पर्धेसाठी सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनय पाउलबुधे, साई पाउलबुधे, डॉ.श्रद्धा पाउलबुधे, आर.डी.बुचकुल, आर.ए. देशमुख, रघुनाथ कारमपूरी सर्व सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com