RPI | पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते माजी खासदार प्रा जोगेन्द्र कवाडे 10 एप्रिल रोजी नगर जिल्हा दौऱ्यावर
नगर- पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते , मा. खासदार प्रा जोगेन्द्र कवाडे सर हे 10 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळाच्या अनावरण प्रसंगी
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक आमदार संग्राम भैय्या जगताप पुतळा समितीचे सुरेश बनसोडे , तसेच पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी दिली आहे .
तसेच अभूतपूर्व होणाऱ्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने आंबेडकरी जनतेने उपस्थित रहावे असे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे .