हनुमान चालीसा पठणाने सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते- नरेंद्र कुलकर्णी

 हनुमान चालीसा पठणाने  सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते- नरेंद्र कुलकर्णी 

हनुमान चालीसा पठणाने  सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते- नरेंद्र कुलकर्णी



             नगर : दर्शक । हनुमान चालीसा पठाणाने अनेक चांगले फायदे,परिणाम होतात.हे अनुभवले पाहिजे ते शब्दात सांगता येत नाही,चालीसा मुळे वातावरणात शुद्धी व आत्मिक समाधान मिळते तसेच मानसिक शांतता,वैचारिक शुद्धता निर्माण होते.या कलियुगात संरक्षक कवच त्यामुळे निर्माण होते.



सध्या ऋतुचक्र बदललेले,सामाजिक प्रश्न,अशांतता,असमाधानान  यामध्ये शांतता व समाधान हनुमान चालीसा  पठणाने  मिळते व सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्यामुळे आम्ही आमच्या मंडळाच्या वतीने दरवर्षी हनुमान चाळीस चे आयोजन करतो असे प्रतिपादन भाजपाचे जेष्ठ नेते नरेंद्र कुलकर्णी यांनी केले.


 

             नगर शहरांमध्येश्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ,सर्जेपुरा द्वारा आयोजित सामुहिक हनुमान चालिसा पाठ व भजन संध्या स्वामी विवेकानंद मित्र मंडळाच्या वतीने शनिगल्ली येथे या  कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यावेळेस ते बोलत होते.

 

            हनुमान चालीसाच्या कार्यक्रमात भक्तीचे रंगात  भाविक भक्तानी तल्लीन झाले होते.येथे भक्ताची देवीचे मंदिर असल्याने अनेक देवीचे गीते पण सादर केली गेली भाविकांनी सामुदायिक पठणात  सहभाग घेतला. हनुमान चालीसा गायन व विविध भजने सादर झाली.हनुमानाच्या आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमात  मोठ्या संख्नेने  भाविक भक्त उपस्थित होते.



         कार्यक्रम यशस्वीतेसाठी  मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.हनुमान चालीसा कार्यक्रमानंतर सर्व उपस्थित प्रसाद  देण्यात आला व  फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या