Ahmednagar Bar Association | अहमदनगर सेंट्रल ॲडव्होकेट्स बार असोसिएशन आयोजित द्विशताब्दी महोत्सवानिमित्त व्याख्यानमाला
Ahmednagar Bar Association | नगर : दर्शक ।-जिल्हा न्याय व्यवस्थेचा २०२ वर्ष पुर्ती महोत्सव वैशिष्टपुर्ण व्याख्यानमाला, विविध मान्यवरांचा सन्मान, ऐतिहासिक उज्वल परंपरेचा वारसा जतन करीत विविध स्मृतींना उजाळा देत संपन्न झाला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मा. अभयजी ओक साहेब, न्यायमुर्ती मा. प्रसन्नजी वराळे साहेब, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मा. उर्मिला फलके-जोशी, मा.संतोषजी चपळगावकर, मा. रोहितजी जोशी व प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती अंजु शेंडे आदी मान्यवरांच्या उपस्थीतीत अहमदनगर सेंट्रल ॲडव्होकेट्स बार असोसिएशनने द्विशताब्दी महोत्सवाचे शानदार आयोजन केले होते.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मा. अभयजी ओक यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे महत्व आधोरेखीत करताना विविध विकास प्रकल्प राबवीताना पर्यावरणाविषयीची संवेदनशिलता राहिली नाही तर भविष्यात गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची वेळ येईल. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे शिक्षण शालेय जिवनातुन देण्याची गरज आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
सेंट्रल बार असोसिएशनने राज्य घटनेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे पार्श्वभुमीवर व्याख्यानमालेच्या आयोजनाचे कौतुक करताना कुठल्याही संस्थांनी राज्य घटनेवरील चर्चेच्या विचार मंथनाचे कार्यक्रम आयोजीत केल्यास न्यायमुर्ती म्हणुन तेथे जाण्याचे आमचे कर्तव्य आहे व ते आम्ही पार पाडले, अशा शब्दात त्यांनी या कार्यक्रमास न जाण्याच्या भुमीकेच्या पाठपुराव्याचा खरपुस समाचार घेतला, तेथे अधिकृत वा अनाधिकृत असे प्रश्नच उदभवत नाहीत. वकिलांना बंधुत्वाचा विसर पडता कामा नये- मा. श्री. अभयजी ओक साहेब, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती
सर्वोच्य न्यायालयाचे न्यायमुर्ती मा. श्री. प्रसन्नजी वराळे यांनी संविधानाने मानवी मुल्यांना वाचा दिली. संविधान प्रस्तावना सर्वांनी वाचली पाहिजे व तोच खरा आत्मा असुन संवेदनशिलतेचे प्रतीक आहे. घटनेने समाजातील प्रत्येक घटकांचा अभ्यास केला असुन त्याचे नेहमी न्यायदान प्रक्रियेत प्रत्यय परावर्तीत होत असल्याचे प्रेरणादायी विचार मांडले. आपल्या जिल्हयाच्या प्रधान जिल्हा न्यायाधिश मा. अंजु शेंडे मॅडम यांनी सदरील व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे भरभरुन कौतुक केले व हा कार्यक्रम येथील न्यायाधिशांना ज्ञानाची शिदोरी मिळण्याची एक पर्वनीच आहे असे प्रतिपादन केले.
जिल्हा न्यायदान प्रक्रियेच्या २०२ वर्षाचा सुक्ष्म मागोवा घेणारी विविध व्यक्तींची मने सचित्र असलेली 'न्यायमंदीर' या श्री. अशोक कुरापाटी यांनी संपादीत केलेल्या स्मृतीग्रंथाचे मान्यवरांनी प्रकाशन केले. श्री. कुरापाटी यांचा न्यायमुर्ती ओक यांनी सन्मान केला. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती मा. उर्मिलाजी फलके जोशी, मा. संतोषजी चपळगावकर, मा. रोहितजी जोशी तसेच प्रधान जिल्हा न्यायाधिश श्रीमती अंजु शेंडे, तसेच निवृत्त न्यायाधिश मा. बी.जी. कोळसे पाटील आदी मान्यवरांची समयोचीत भाषणे झाली असुन सत्कारही झाला.
तसेच या कार्यक्रमास इतर निवृत्त न्यायमूर्ती श्रीमती शालीनी जोशी-फणसाळकर, मा. साधना जाधव, मा. विनय जोशी, मा. एम.जी. सेवलीकर, बार कॉन्सील मा. सदस्य ॲड आर.बी. प्लाटे, ॲड. दिपलक्ष्मी म्हसे, ॲड . विश्वासराव आठरे पाटील, ॲड . अशोक पाटील, ॲड . चांगदेव डुबे पाटील, ॲड . उदय वारुंजीकर यांचा देखील यथोचित सन्मान झाला. या कार्यक्रमास जिल्हा न्यायालयाचे कार्यरत असलेले न्यायाधिश हजर होते.
सेंट्रल ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष मा. ॲड . अशोक कोठारी यांनी नगर जिल्हयाच्या ऐतिहासिक थोर उज्वल परंपरेचा मागोवा घेऊन न्यायदान प्रक्रियेतील महत्वाच्या योगदानांचा कृतज्ञतापुर्वक उल्लेख करुन व्याख्यान मालेच्या आयोजनातुन मिळणा-या समृध्द इ गगनाचा, अनुभवाचा नव्या पिढीस प्रेरणा मिळुन 'न्याय सर्वांसाठी' या तत्वानुसार न्यायदान प्रक्रियेला गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा सरकारी वकिल ॲड. एस.के. पाटील यांनी अभार मानले. प्रा. प्रसाद बेडेकर यांनी सुत्रसंचालन केले व सौ. अमृता बेडेकर हिच्या सुश्राव्य पसायदानाने या शानदान सोहळयाची सांगता झाली. कार्यक्रमास जिल्हयातुन, परजिल्हयातुन न्यायदान प्रक्रियेतील न्यायाधिश, विधीज्ञ, विविध क्षेत्रातील मान्यवर, कायदयाचे अभ्यासक विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सेंट्रल ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. अशोक कोठारी यांचेसह उपाध्यक्ष ॲड . अनिल ढगे, रामबाबु खंडेलवाल, सचिव- ॲड योगेश काळे, सहसेक्रेटरी ॲड . सौरभ काकडे, खजिनदार- ॲड . अभिजीत देशपांडे तसेच बार असोसिएशनचे सदस्य ॲड . उमेश नगरकर, ॲड समिर सोनी, ॲड. बी.टी.पाटील,ॲड .तरीन शेख, ॲड.फारुक शेख, ॲड . संतोष वाळुंज, ॲड . हेमंत कराळे, ॲड. राजेश पुलाटे, ॲड . मधुकर कोरडे, ॲड . विजय भगत, ॲड. योहान मकासरे, ॲड . मृणाली वाळुंज, ॲड. रेणु कोठारी व इतर सर्व सदस्यांनी तसेच कार्यकारी समिती सदस्य ॲड . विश्वास आठरे पाटील, ॲड . जयवंत भापकर, ॲड . एस.जे. काकडे, ॲड . के.एम. देशपांडे आणि इतर सर्व पदाधिकारी, कार्यकारणी व सभासद वकिल मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले.
.webp)
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com