Meherbaba | मेहेरबाबा सेंटरचे सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
नगर-मधील सरोष पेट्रोलपंपा शेजारील अवतार मेहेरबाबा नगर केंद्रामध्ये अवतार मेहेरबाबाच्या १३१ वा जन्मोस्तव निमित्त गेले ५ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
यामध्ये आज अहमदनगर सेंटरचे स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम मध्ये भजन,मुलांचे डान्स,नाटिका,नृत्य,गाणे, गीत,गझल सादर केले गेले. परदेशी मेहेरप्रेमींचे संगीत,ह्यू मॅक्डोनाल्ड यांचे जादूचे प्रयोग यावेळी संपन्न झाले तसेच यावेळी बक्षीस वितरण संपन्न झाले
आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी नगर सेंटरचे अध्यक्ष डॉ मेहेरनाथ कलचुरी,उपाध्यक्ष वैभव जोशी,रमाबाई कलचुरी,दीपक थाडे,नितीन थाडे,मधुकर डाडर याच्यासह पदाधिकारी व सदस्य तसेच नगरसह देश विदेशातील मेहेरप्रेमीं उपस्थित होते.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com