Misgar Jamat | नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट या संस्थेस दिलेली नोटीस महानगर पालिका यांनी रद्द केली
नगर - नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट या संस्थेची पंडित नेहरू पुतळा जवळील मालकीच्या जागेत संरक्षक भिंत कंपाउंड वॉल संस्थेच्या जागेत गेली 22 वर्षापासून बांधलेली आहे. परंतु काही लोकांनी महानगरपालिकेचे दिशाभूल करून सदर भिंत ही बेकायदेशीर आहे असे दाखवले होते.
या कारणास्तव प्रभाग अधिकारी तीन यांनी दिनांक 3 मार्च 2025 रोजी भिंत पाडण्याकरिता 24 तासाची मुदत दिली होती. सदर नोटीसीच्या विरुद्ध संस्थेचे विश्वस्त युनूस सुलतान तांबटकर व इमरान शफी अहमद शेख यांनी माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ येथे दिनांक 5 मार्च 2025 रोजी याचिका दाखल केली. सदर याचिकेबद्दल सुनावणी सहा मार्च 2025 रोजी ठेवण्यात आली असताना महानगरपालिका अहमदनगर प्रभाग अधिकारी यांनी दिलेली नोटीस ही 6 मार्च 2025 रोजी स्वतः रद्द केली.
सदर जागेबाबत वाद अहमदनगर न्यायालय तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयात दाखल आहेत,असे असताना महानगरपालिकेची दिशाभूल करून सदर जागे मध्ये बेकायदेशीर बांधकाम केलेले आहे अशी खोटी व दिशा भूल करून सदर जागेवरील भिंत बेकायदेशीर आहे म्हणून तोडण्यात यावी अशी नोटीस देण्यात आली होती. दरम्यान महानगरपालिकेने दिलेली नोटीस स्वतः मागे घेतली आहे. सदर प्रकरण औरंगाबाद उच्च न्यायालय येथे प्रलंबित आहे.असे युनुस तांबटकर यांनी सांगितले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com