संघर्ष प्रतिष्ठानाच्या हनुमान चालिसा व भजन संध्याने भाविक मंत्रमुग्ध

 संघर्ष प्रतिष्ठानाच्या हनुमान चालिसा व भजन संध्याने भाविक मंत्रमुग्ध 

नगर : दर्शक |     चालिसा पठण व भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.



नगर : दर्शक |


 चालिसा पठण व भजनसंध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्याच्या हस्ते आरती करण्यात आली. याप्रसंगी परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


     दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळाच्यावतीने या हनुमान चालिसामध्ये गायिलेल्या भक्तीगीतांने भाविक मंत्रमुग्ध झाले होते. यामध्ये विविध भक्ती गीते तसेच भजने गाण्यात आले. 


तसेच सामूहिक हनुमान चालीसा पठणात यामध्ये शेकडो भावीक भक्त सहभागी झाले होते. या हनुमान चालिसा कार्यक्रमात दक्षिण मुखी हनुमान सत्संग मंडळाचा सेवक हनुमानाची वेशभुषा परिधान करुन सहभागी झाला.

 

सेवक हनुमान लहान भक्तांना खाऊ वाटप करत असल्याने बालगोपाल मोठ्या आनंदाने ते घेत होते.सेवक हनुमानासोबत नृत्य देखील करत होते. त्यामुळे या कार्यक्रमाला आणखीनच रंगत आली होती. 


महाआरतीनंतर महाप्रसादाचा वाटप संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्ट वतीने करण्यात आले. हनुमान चालिसा व भजन संध्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघर्ष प्रतिष्ठान ट्रस्टचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या