Award | बौद्ध संस्कार संघाच्यावतीने दि.14 रोजी ‘भीम पहाट’
Award | नगर : दर्शक | भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोमवार दि.14 एप्रिल 2025 रोजी पहाटे 5 वाजता बौद्ध संस्कार संघाच्यावतीने ‘भीम पहाट’ कार्यक्रमाचे चेतना लॉन, छत्रपती संभाजीनगर रोड, नगर येथे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या भीम पहाट कार्यक्रतात यंदा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या व्यक्तींना भीमपहाट सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहेत.
यामध्ये महाराष्ट्र शासन - समाज भूषण कल्पनाताई सूर्यवंशी, मुंबई, नगर शहरातील गायक व निवेदक राजेंद्र टाक, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम जोशी यांना भिमपहाट सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती भाऊसाहेब देठे यांनी दिली.
या कार्यक्रमात भीमप्रेमी गीत गायक संगीत सितारे परिवार हे बहारदार भीम गीते सादर करणार आहेत. या भीम पहाट कार्यक्रमात निवेदक, गायक विनय कसबेकर, महाराष्ट्र शासन समाजभूषण महागायीका कल्पना सुर्यवंशी, स्वरमिलम ऑर्केस्ट्राचे अतुल थोरात, ऑर्केस्ट्रा भीमसूर्व क्रांतीचे नरेश बडेकर, भीमशाहीर, लोकशाहीर शिवाजी शिंदे, गायीका आशा, गायीका रंजना, शितल शिंदे, धनश्री पोखरणा आदी कलाकारांचा सहभाग असणार आहे.
तरी या कार्यक्रमास भीमप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बौद्ध संस्कार संघाच्यावतीने भाऊसाहेब देठे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो.98815311188 या क्रमांकावर संपर्क साधावा.
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com