अहमदनगर महाविद्यालयाचा इ. १२ वी चा ९३ टक्के निकाल
अहमदनगर- फेब्रुवारी/ मार्च २०२४ मध्ये झालेल्या इ.१२ वी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल नुकतेच जाहिर झाले आहेत. यांत अहमदनगर महाविद्यालयाचा सायन्स विभागाचा निकाल ९७ % तर काॅमर्स विभागाचा ९१ % आणि आर्टस विभागाचा ८१ % लागला आहे. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९३% टक्के लागला आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये सायन्स विभागात पुथुवल आदित्यन राजप्पन याने ६०० पैकी ५१२ गुण मिळवुन महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला तर शेख फुझेल अहमद शाहबाज याने ६०० पैकि ४९९ गुण मिळवुन महाविद्यालयात द्वितीय क्रमांक पटकवला. तसेच नागपुरे सिद्धी सूरज हिने ६०० पैकी ४९३ गुण मिळवुन महाविद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला आहे.
कॉमर्स विभागात मेहेर अनुष्का अविनाश हिने ६०० पैकी ५२७ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर गिरगास कावेरी योगेश हिने ६०० पैकी ५१४ गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तसेच सय्यद स्वलेहा हिने ६०० पैकी ५०९ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. आणि आर्ट्स विभागात सय्यद मरियम मुदस्सर ने ६०० पैकी ५५७ गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर ठोकळ आदित्य सतीश याने ६०० पैकी ५४६ गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तसेच परपिया अलिझा अकबर हिने ६०० पैकी ५३८ गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.
महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांच्या हस्ते या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्युनियर काॅलेजचे उपप्राचार्य विनीत गायकवाड उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्यासाठी प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस यांनी शुभेच्छा दिल्या.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com