‘आशिया टॉप 10 ज्योतिष’ पुरस्काराने तुषार घाडगे सन्मानित
अहमदनगर (प्रतिनिधी) - इंदोर येथे आयोजित माता भुवनेश्वरी ज्योतिष वास्तू कर्मकांड शोध संस्थान यांच्यावतीने दोन दिवसीय ज्योतिष संमेलन नुकतेच संपन्न झाले. इंदोर येथे झालेल्या या अधिवेशन संमेलनासाठी देशभरातून ज्योतिषी उपस्थित होते. यामध्ये अहमदनगर मधील प्रख्यात ज्योतिषाचार्य तुषार घाडगे यांना ज्योतिष क्षेत्रातील प्रतिष्ठेचा ‘आशिया टॉप 10 ज्योतिष 2024 पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.
गोरखपुर येथील धर्म जागरुक मंचचे अध्यक्ष डॉ.धनेशमणी त्रिपाठी, पंडित आचार्य सुभेस शरमन, अखिल भारतीय संत समिती आचार्य संतोष भार्गव, लाल किताब कुंडलिचे निर्माते जी.डी.वशिष्ठ, अनिल वत्स, जीतू बाबा आदि मान्यवरांच्या हस्ते तुषार घाडगे यांना सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
पुरस्कार मिळाल्यानंतर तुषार घाडगे म्हणाले, ज्योतिषी क्षेत्रात सेवा करतांना सामान्य माणसाचेहित जोपासत काम केले. अडी-अडचणीत असलेल्या तरुणांना योग्य मार्गदर्शन देत हस्तेरेषेवरुन नोकरी, लग्न आदि प्रश्न अभ्यासपूर्वक सोडविले, त्यामुळे माझ्याकडे येणार्यांचे समाधान होते. आजचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने माझे मनोबल अजून वाढले आहे, असे ते म्हणाले.
श्री.घाडगे यांना यापुर्वी ज्योतिष महामेरु, ज्योतिष शिरोमणी, राष्ट्रीय ज्योतिष गौरव असे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाल्याने भिंगारकरांचे भुषण तुषार घाडगे यांनी नगरचे नाव उंचावले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com