सावेडी ध्यान योगा केंद्रात अनुभवली सुदर्शन क्रिया
अहमदनगर (प्रतिनिधी) - आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते प. पू. श्री श्री रविशंकरची यांचे ६८ व्या वाढदिवसानिमित्त अहिल्यानगर शहरात सावेडी येथील योगा धान केंद्र येथे भव्य हॅपीनेस प्रोग्राम शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरासाठी बंगलोर आश्रम येथील आंतराराष्ट्रीय प्रशिक्षक श्री सलीलजी पुळेकर यांचे सहा दिवशीय शिबीरात उपस्थितीतांना अनमोल मार्गदर्शन मिळाले.
यामध्ये नगरचे प्रशिक्षक चंद्रकांत तागड, नरेंद्र बोठे, बीना हेगडे, संगिता पाचे, सुपर्णा देशमुख, सुनिता घाडगे, रोहिणी गवळी, रमाकांत गंगापूरकर, सुनिल कानडे, अपूर्वा गुजराथी, पूनम थोरात इ. अनेक प्रशिक्षकांनी यामध्ये सेवा योगदान दिले. या शिबीरात सुमारे १२५ पेक्षा जास्त लोकांनी आपल्या आरोग्यासाठी योगा अभ्यास, प्राणायम, मेडीटेशन आणि शारीरिक मानसिक स्वास्थासाठी, शरीराच्या शुद्धीसाठी सकाळी व संध्याकाळच्या सत्रामध्ये याठिकाणी श्री श्री रविशंकरजी यांचे मार्गदर्शनात सुदर्शन क्रिया साधनेचा अनुभव घेतला.
दैनंदिन जीवनात संघर्ष, ताण-तणाव, व्यसनमुक्तीसाठी तसेच आनंदी जीवनासाठी केलेले प्रयत्न, नैराश्य व चिंता या गोष्टी पासून निश्चित चांगल्या पद्धतीने जगण्याची कला अवगत झाली, अश्या प्रकारची प्रतिक्रया सर्वांनी दिली. शिबीरामध्ये दररोज होणराऱ्या ज्ञान चर्चानुसार आनंदी जीवनाची गुरुकिल्ली मिळाल्याचे आनंद व्यक्त केल्या.
अत्यंत उत्साही वातावरणात उपस्थित साधाकांनी या शिबीरामुळे त्यांना शारीरिक मानसिक स्तरावर अत्यंत लाभ झाला व जीवन जगण्याची कला अवगत झाली. सध्याच्या संघर्षमय धकाधकीच्या जीवन पद्धतीमुळे आलेला ताण-तणाव व त्याचबरोबर समाजातील आहारातील झालेल्या बदलामुळे शारिरीक व्याधी नवीन उत्पन्न झालेले आरोग्याविषयी व्याधी अश्या अनेक स्वास्थाच्या तक्रारींवर योग्य मार्गदर्शन मिळाले. विशेषतः जगभरात प्रसिद्ध असणारी श्वसनाच्या माध्यमातून प्राणावर नियंत्रण प्राप्त करणेसाठी प्रसिद्ध सुदर्शन क्रिया ही या कोर्समध्ये शिकवली जाते. विशेष शिबीराचे आयोजनासाठी नगर शहरातील आर्ट ऑफ लिव्हिंगचे सर्व प्रशिक्षक, प्रशिक्षकांनी आपले सेवा योगदान दिले.
सर्वांचे आरोग्य, जीवन सुखी-समृद्धी राहण्यासाठी शहराच्या सावेडी येथील आर्ट ऑफ लिव्हिंग ध्यान मंदिर, गावडे मळा येथे वारंवार अश्या शिबीराचे आयोजन केले जाते. याचठिकाणी दि. १५ ते २१ मे आणि दि. २१ ते २६ मे दरम्यान सकाळी ६ वा. पुन्हा हे शिबीर होत असून याशिबीराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अहमदनगरचे प्रशिक्षक कृष्णा पेंडम यांचे वतीने करण्यात येत आहे.
शिबीरासाठी ९४२२२२०८०४ या नंबरवर संपर्क करावे. सोमवर दिनांक १३ मे रोजी श्री श्री रविशंकरजी यांचे जन्मदिवस निमित्त तसेच हॅपिनेस प्रोग्राम सांगता निमित्त सकाळी भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याच दिवशी सायंकाळी दिव्य भक्ती गीतांचा कार्यक्रम सत्संग उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी या कार्यक्रमास शहरातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने आरोग्य शिबीर आणि आयोजीत कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा. ही नम्र विनंती. अशी विनंती आर्ट ऑफ लिव्हिंग अहिल्यानगर परिवाराचे वतीने करण्यात येत आहे करावे.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com