Ahmednagar BJP: खासदार विखेंना शहरातून 31000 च्यावर लीडचा कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये : वसंत लोढा
अहमदनगर (प्रतिनिधी) - लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर अहमदनगर शहरात मिळालेल्या मतदानातून मोठ्या प्रमाणात भाजपा व माझ्यामुळे खासदार विखेंना अहमदनगर शहरातून 31000 च्या वर लीड मिळाला आहे. याचे श्रेय घेण्याचा लाजिरवाणा प्रयत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व काही वृत्तपत्रातून जाणून-बुजून चालू आहे.असे प्रतिपादन भाजपा चे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा यांनी केले.
अहमदनगर शहरात भारतीय जनता पार्टीचे पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. 1991 साली माननीय राजाभाऊ झरकर लोकसभेला उभे होते. त्यांना मिळालेल्या एकूण मतांमध्ये नगर शहरातून 24 हजार मते मिळाली होती. विखे विरुद्ध गडाख यांच्या अटीतटीच्या निवडणुकीत ही मते मिळाली होती. खासदार दिलीप गांधींना मोठे मताधिक्य ही अहमदनगर शहरातून मिळत होते.
तसे खासदार विखे यांना 2019 च्या निवडणुकीत 54 हजार मताधिक्य होते त्यापेक्षा जास्त मताधिक्याची यावेळेस अपेक्षा होती परंतु 20२४ निवडणुकीत सहकारी पक्षांचा विचार केला तर लीड फक्त 31000 ची मिळला त्याला कारण अहमदनगर शहराच्या लोकप्रतिनिधी बाबत असलेली नाराजी त्याची व त्यांच्या टोळीची असलेली दहशत अवैध धंदे, व्यवसायाची वाढलेले मोठे जाळे नगर शहरात होणारे त्यांच्या माध्यमातून जागा ताबामारी, शहरात होणारे खुणाचे सत्र, एस पी ऑफीस प्रकरण पोलिसांना हाताशी धरून विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे इत्यादी अनेक प्रकार शहरात चालू आहे.
आता तर सत्तेत असल्यामुळे या सर्व गोष्टींना राजाश्रय मिळाला सारखे झालेले आहे. त्यामुळे अहमदनगर शहरातील व्यापारी, बाजारपेठेत व सर्वसामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्या बद्दल नाराजी होती.
खासदार विखे यांना मत दिले तर यांची दहशत गुंडगिरी व अवैध व्यवसाय, जागा ताबामारी अजून मोठ्या प्रमाणात वाढेल. या विचारातून तसेच खासदार विखे यांच्या फॉर्म भरायच्या मिरवणुकीत ज्या पद्धतीने शक्ती प्रदर्शन झाले. कर्डिले जगताप कोतकर त्यांचा मोठ्या प्रमाणावर परिणाम शहरातील लोकांवर झाला त्यामुळे लीड कमी झाला. कमी लीडमुळे खासदार विखेंचा पराभव झाला.
या निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान या सर्व प्रकारची जाणीव झाली होती. त्याप्रमाणे संबंधितांना सांगितले होते की शहराततील या प्रवृत्तीला फार पुढे न आणता प्रचार करावा पण त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.
31 हजारचा लीड जो आहे तो भारतीय जनता पार्टीचा हा लीड आहे कोणी श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये.
अहमदनगर शहरात भाजपाने स्वबळावर विधानसभा निवडणूक या प्रवृत्तीच्या विरोधात लढवावी. त्याबाबत शहराची सध्याची असलेली भयानक परिस्थिती वरिष्ठांना पुराव्यासह देऊनही निवडणूक आम्ही लढून जिंकू असा आत्मविश्वास वसंत लोढा ययांनी व्यक्त केला आहे.
आता तर पक्षाला या लोकसभा निवडणुकीतून बऱ्याच गोष्टीचा उलगडा झालेला. या सोयरे धायरे पद्धतीमुळे भाजपचे अहमदनगर शहरात या दहा वर्षात फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा पराभव आहे असे भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत लोढा यांनी सांगितले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com