डॉ.पाउलबुधे विद्यालयात 10वी, 12 वी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी) - दहावी व बारावी हा जीवनाचा पहिला टप्पा आहे. आयुष्याच्या पुढील टप्प्यात यशस्वी होण्यासाठी स्वत:च्या पायावर उभे राहून आई-वडिलांनी केलेले संस्कार शिक्षकांनी दिलेली ज्ञानाची शिदोरी तुमचे चांगले करिअर घडविण्यासाठी मोलाची ठरणार आहे.
मात्र तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचे, त्याबाबत ध्येय निश्चित करा. आवडीच्या क्षेत्रातच करिअर करा, असे प्रतिपादन सेवा शिक्षण प्रसारक मंडळाचे सह सचिव आर. ए. देशमुख यांनी केले.
वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 10 वी व 12 वी मधील प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या सर्व शाखांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव संस्थेच्या वतीने विद्यालयात करण्यात आला.
याप्रसंगी आर.ए.देशमुख, प्रा.दादासाहेब भोईटे, प्राचार्या डॉ. रेखाराणी खुराणा, प्राचार्या अनुराधा चव्हाण, प्राचार्य भरत बिडवे, प्रा. क्रांती घोडके, प्रा.रोहिदास चौरे, प्रा. विष्णू मगर, प्रा.राजेंद्र मोरे, प्रा.लक्ष्मण बेळगे आदी उपस्थित होते.
प्रा.दादासाहेब भोईटे यांनी आपल्या भाषणातून स्व.डॉ.नाथ पाउलबुधे साहेबांनी गोर-गरीब, कष्टकरी, सर्वसामान्य कुटूंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी संस्थेची उभारणी करुन शिक्षण देण्याचा संकल्प केला. तो विद्यार्थ्यांनी चांगल्या निकालाने साध्य केला असे वाटते. भविष्यात विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्था कायम सहकार्य करील, असे सांगितले.
प्रास्तविकात प्राचार्य भरत बिडवे यांनी सांगितले कि संस्था उभारणीपासून ते आजपर्यंतच्या खडतर प्रवासानंतर मोठे शैक्षणिक संकुल म्हणून जिल्ह्यात डॉ.ना.ज.पाउलबुधे ओळखले जात आहे.
संस्थेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. विद्यार्थीही आपल्या मेहनतीने विविध स्पर्धा, परिक्षांमध्ये यश संपादन करत आहेत. इ.10 वी 12 वी विद्यार्थ्यांची सुरुवातीपासूनच चांगली तयारी करुन घेत असल्याने विद्यालयाच्या चांगल्या निकालाची परंपरा कायम आहे. पाउलबुधे संस्थेत प्राथमिक शिक्षणापासून ते तंत्रशिक्षण, फार्मसी सारखे उच्च शिक्षण या ठिकाणी मिळत असल्याने विद्यार्थीही परिपुर्ण होऊनच येथून बाहेर पडतो, असे सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यानी, पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा.भारती थोरवे यांनी केले तर आभार प्रा.आशा गावडे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षकवृंद, पालक उपस्थित होते.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com