Bakery | जय जलाराम फूड्सचे नवीन एक्सपीरिअन्स स्टोर्स आणि डेझर्ट डेस्टिनेशन
अहमदनगर । दर्शक
महाराष्ट्रातली पहिली शुद्ध शाकाहारी बेकरी म्हणजे जय जलाराम ती बंगाल चौकी येथील जागेत सुरू झाली आणि बेकरी पदार्थांचे वितरण येथूनच होई. त्याच जागेत आता नवी व सुसज्ज इमारत उभी राहिली आहे. जुन्याशी नाते अधिक घट्ट करायचे म्हणून आपण नवीन जागेत एक्सपीरिअन्स स्टोर्स' सुरू केले आहे. अशी माहिती सौ व श्री नकुल चंदे,दीपा चंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले बेकरी व्यवसाय, हे क्षेत्र अत्याधुनिक होत आहे, नवनवीन कल्पना स्वीकारत आहे, हेच ह्या माध्यमातून नगरकरांपुढे मांडत आहोत. पाव शतकानंतर, म्हणजे २७ वर्षांनंतर आधुनिक इमारतीत आलो आहेत , म्हणून उत्पादनांमध्ये काही वाढविण्याचा प्रयत्न केला. ह्या निमित्ताने आमच्या बेकरीत २५-२७ नवीन, वेगळ्या पदार्थांचे उत्पादन सुरू करीत आहोत.
चव आणि आरोग्य ह्याची सांगड आम्ही नेहमीच घातली. ती ह्या नवीन उत्पादनांमध्येही दिसेल. ही बेकरी सुरू करणारे माझे वडील दिवंगत दिलीप चंदे आणि त्यांना साथ देणारी माझी आई दीपा चंदे ह्यांनी हायजिन नेहमीच सर्वाधिक महत्त्वाचे मानले, ती स्वच्छता, उत्पादनाची आरोग्यदायी पद्धत आजही कायम आहे. बेकरीतील बहुसंख्य काम मानवी हाताचा स्पर्श न होता पूर्ण होते. जेथे माणसांचा संबंध येतो, ते आमचे कर्मचारी व्यक्तिगत आरोग्याची पूर्ण काळजी घेतात.
नवीन पदार्थ ग्राहकांना उपलब्ध करण्यापूर्वी आम्ही प्रयोग केला बंगाल चौकीवरील आधुनिक इमारतीतील 'जय जलाराम एक्सपीरिअन्स स्टोर्स'चे पारंपरिक पद्धतीने उद्घाटन केले नाही. हे नवीन पदार्थ ग्राहकांना, स्नेहीजनांना आणि एकूणच नगरकरांना कसे वाटतात, हे जाणून घेण्यासाठी गेले काही दिवस आम्ही टेस्ट फेस्ट आयोजित करीत आहोत.रोज मित्रमंडळी, खेही, ग्राहक ह्यांना येथे आमंत्रित करती विविध पदार्थांची ते चव घेतात, त्याबद्दलचा त्यांचा अभिप्राय आम्ही नोंदवून घेतो.
आमच्या नवीन पदार्थांबद्दल सांगायचे तर जगात बेकरीचे जे काही पदार्थ आहेत ते सर्व नगरकरांना मिळालेच पाहिजेत, हा ध्यास आहे. यामध्ये ज्वारीची प्युअर बटरमधील बिस्किटे, पॅटीस डाएट ढोकळा ,कच्छी दाबेली ,चटणी सैंडविच ,बेक्ड वडा पाव.
हे चार सॅक्स जय जलाराम ने उपलब्ध केले आहेत.सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे प्रवासात नेण्यासाठी हे चारही पदार्थ अतिशय सोयीचे आहेत. डोसा खाकरा - खाकऱ्यामध्ये चीज फ्लेवरमध्ये असलेला खाकरा खाल्ल्यावर खराखुरा डोसा खाल्ला असेच आपली जीभ सांगेल, तसेच वेगवेगळ्या केकपासून छोटे फ्रेंच डेझर्ट चीज केक, कोल्ड कॉफी हॉट कॉफी असे बरेच काही मिळेल.
जय जलाराम फूड़ प्रॉडक्ट्स'चा सतत एकच प्रयत्न राहिला आहे नवनवीन गोष्टी आणत राहणे, बंगाल चौकीमधील आमचे एक्सपीरिअन्स स्टोर्स' आणि नवीन पदार्थ त्याचाच एक भाग आहेत.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com