Lifetime Achievement Award | चित्रकार श्रीधर अंभोरे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर
Lifetime Achievement Award | नगर : दर्शक । - नगर येथील ख्यातकीर्त रेखाचित्रकार श्रीधर अंभोरे यांना संभाजीनगर येथील पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे प्रतिष्ठान तर्फे यंदाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला झाला आहे. प्रतिष्ठानच्या डॉ. निवेदिता पानतावणे व प्रा. नंदिता पानतावणे यांनी ही माहिती दिली.
प्रतिष्ठानच्या वतीने येत्या शनिवारी दि. 29 मार्च रोजी चिखली बुलढाणा येथे अस्मिता दर्शक कार पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे स्मुर्ती व व्याख्यान मालिका तसेच जीवनगौरव पुरस्कार वितरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी विचारवंत ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. प्रल्हाद लुल्लेकर असतील तर प्रमुख पाहुणे म्हणून सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते सुनील शेळके उपस्थित राहणार आहेत.
श्रीधर अंभोरे हे एक प्रतिभावान चित्रकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्या रेखा चित्राची खास स्वतंत्र शैली असून त्यांची महाराष्ट्रात हजारो चाहते आहेत. पु. ल देशपांडे, विजय तेंडुलकर यांच्यासारख्या दिग्गजांनी अंभोरेच्या चित्रांचे जाहीर कौतुक केले आहे.
वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी त्यांना कला क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा इचलकरंजी येथील फाय फाउंडेशन पुरस्कार मिळाला आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क आर्ट गॅलरीत भरवण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनास त्यांच्या चित्रांचा समावेश होता. साहित्य आणि चित्रकलेची उत्तम जाण आणि सजग असे सामाजिक भान त्यांच्या कलेतून प्रतीत होते त्यांना दया पवार फौंडेशन, विखे पाटील फौंडेशन, रसिक ग्रुप, इत्यादी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
जीवन गौरव पुरस्कार बद्दल त्यांचे विलास गीते, शशिकांत शिंदे, जयंत येलूरकर, सतीश डेरेकर,, नंदकिशोर आढाव, रवींद्र सातपुते, आबिद दूल्हे खान , संजय दळवी, डॉ. बापू चंदनशिव, ल.धो. खराडे व अरविंद ब्राह्मणे यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले आहे.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com