काँग्रेस नेते किरण काळेंची बदनामी करणे पवनकुमार अग्रवालला चांगलेच भोवले... तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
काळेंच्या बदनामीचे षडयंत्र, काँग्रेसचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी ) : काँग्रेस नेते शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणे पवनकुमार अग्रवाल याला चांगलीच भोवले आहे. अग्रवाल याने "मालकी हक्काच्या जागेत अनाधिकाराने घुसून, धक्काबुक्की, शिवीगाळ प्रकरणी किरण काळेंवर गुन्हा दाखल करावा" असे वक्तव्य पत्रकार परिषद घेत केले होते. यावरून काळे यांनी उत्खाना पोलीस स्टेशन येथे समक्ष हजर होत अग्रवाल याच्या विरोधात भादवि 500 अन्वये सी आर पी सी च्या सेक्शन 155 अंतर्गत समाजात नाहक आपली बदनामी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीत काळे यांनी म्हटले आहे की, गैर अर्जदार पवन कुमार अग्रवाल याने पत्रकार परिषद गंगाराम हिरानंदानी या इसमासह आयोजित करून समाज माध्यमांमध्ये "मालकी हक्काच्या जागेत अनाधिकाराने घुसून, धक्काबुक्की, शिवीगाळ प्रकरणी किरण काळेंवर गुन्हा दाखल करावा" असे वक्तव्य करून तक्रारदार किरण काळे यांची समाजातील असणारी प्रतिष्ठा खराब करत नाहक बदनामी केली आहे. यावरून अग्रवाल याच्या विरुद्ध बदनामीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना माथाडी कामगार काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे म्हणाले की, किरण काळे यांनी कोणाच्याही मालकी हक्काच्या जागेत अनाधिकाराने प्रवेश केलेला नसून कोणालाही धक्काबुक्की, शिवीगाळ केलेली नाही. तसा कोणताही गुन्हा त्यांच्या विरोधात कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये दाखल नाही. नगरकरांना माहित आहे की किरण काळे हे काही गुंड नाहीत. ते उच्चशिक्षित असून सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करत असून शहरातील दहशत, गुन्हेगारी, ताबा गॅंग, अन्यायग्रस्तांना मदत करणे,
शहरातील नागरी प्रश्नांवर निर्भीडपणे आवाज उठविणे, शहर विकासासाठी काम करणे ही व्यापक जनहिताची कामे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष या नात्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते सातत्याने करत असून नगरकरांची सेवा करत आहेत. असे असतानाही अन्यायग्रस्तांना मदत करण्याची त्यांची भूमिका असल्यामुळे शहरातील काही तथागतीत कार्यसम्राट मंडळींचा पोटशूळ उठला आहे.
त्यामुळे इतर लोकांना पुढे करून खोटी नाटी वक्तव्य करून किरण काळे यांची समाजात नाहक बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. काँग्रेस योग्य वेळी अशा षडयंत्रांचा भांडाफोड करेल, असा इशारा उबाळे यांनी पक्षाच्या वतीने दिला आहे.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com