महापद्मसेना आयोजित ‘अखंड पद्मशाली चषक २०२४’ चे आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ
अहमदनगर (प्रतिनिधी) - समाजमध्ये महापद्मसेना मोठ्या उत्साहने काम करत आहे. समाजातील तरुण युवकांना नोकरी बरोबरच मैदानी खेळाकडे वळावे त्यांचे आरोग्य उत्तम रहावे म्हणुन भव्य टेनिस बॉल क्रीकेट स्पर्धा भरवुन एक चांगली कामगिरी केली आहे. आज स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी मिळणे फार कठीण झाले आहे. खेळांच्या माध्यमातून तो आपली कामगिरी दाखवुन एक भक्कम स्थान निर्माण करु शकतो. महापद्मसेनेने एक चांगल व्यासपीठ तरुणांना मिळवुन दिले आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
नगर शहरामध्ये महापद्मसेना आयोजित ‘अखंड पद्मशाली चषक २०२४’ भव्य टेनिस बॉल क्रिकट स्पर्धेचे वाडिया पार्क, नगर येथे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पहिला सामना लावुन शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख उपस्थिती नगरसेवक मनोजभाऊ दुलम, समाजसेवक श्रीनिवासजी बोज्जा, समाजसेवक अमित बुरा, अभिजीतदादा खोसे, PSI अनिल अलवाल, अनमल पेंट्सचे रितेशजी अनमल, गिरीशशेठ चिट्ठा, नेहा एजन्सीचे प्रणितजी अनमल, गुरू क्रिएशनचे तेजसजी आकेन, समाजसेवक हरिभाऊ येलदंडी, युवा उद्योजक संजयजी बोगा, महेंद्र भाऊ कवडे, देविदासजी गुडा, संतोषभाऊ लांडे, अजयजी मेरगू, श्री मार्कंडेय पतसंस्थाचे नारायणजी कोडम, पुरुषोत्तमभाऊ सब्बन, विनोदजी म्याना साहेब, येल्लाराम सर, भाऊसाहेब प्रमोद जेटला आणि समाज बांधव उपस्थित होते
यावेळी नगरसेवक मनोज दुलम यांच्या वतीने सांगण्यात आले कि, तरुणांना योग्य वयात चांगले मार्गदर्शन मिळाले नाहीतर तो चुकीच्या मार्गाला लागतो, म्हणुन समाजातील विविध संघटनांनी एकत्र येवुन असे विविध स्पर्धेचे आयोजन करणे गरजे आहे. आजच्या व्हाटस्अप व फेसबुकच्या जमाण्यात मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत चालले आहे, अशा स्पर्धेच्या आयोजनाने युवकांना एक चांगले आरोग्य मिळेल व युवकांच्या सर्वांगीन प्रगती होईल.
हि स्पर्धा आयपीएल प्रमाणे घेण्यात येत असून यामध्ये नगरशहरातील व राज्यातील विविध संघ निवडण्यात आले. यामध्ये १० संघांनी प्रवेश घेतला आहे. प्रत्येक संघाचे ४ लिग मॅचेस प्रमाणे हि स्पर्धा एकूण ६ दिवस चालणार आहे. ६ व्या दिवशी रविवारी दु.३ वा. अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम रोख बक्षिस नगरसेवक मनोजभाऊ दुलम, द्वितीय रोख बक्षिस रवि दंडी, तृतीय रोख बक्षिस श्रीनिवास बोज्जा, मुख्य प्रायोजक हॉबी डिझायनर स्टुडिओचे त्रिलेश येनगंदुल, लक्ष्मी टाईम्सचे संजय मंचे, रेडियन्स हॉटेलचे दत्तात्रय रासकोंडा, गुरू क्रिएशनचे तेजस आकेन, श्रीराम कलेक्शनचे अभिजित सिद्दम, गिरीश चिट्टा, राजेंद्र बोगा, सुहास मंचे, जी एन स्पोर्टचे गोपाल न्यालपेल्ली, अभिषेक गुंटूक(जालना), कृष्णाहरी यलदंडी, गुंडू मोबाईल बाजारचे प्रमोद गुंडू, श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्था, चाय मस्काचे रोहित कोडम, न्यू अनमल पेंट्सचे रितेश अनमल तसेच संघ मालक १) साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठाण, नित्यसेवा
२)जेएमडी सी सी चे रवी कुंदराम, ३)अहिल्यानगर वाॅरिअर्सचे प्रशांत कोक्कुल ४) वाय.मुकुंद टेलर्सचे अभिजित येनगंदुल ५) श्री गुरुदेव दत्तचे संजयजी इरमल (पुणे) ६)आदेश ग्रुपचे रमेश गाजुल ७) स्टाईकर सी सीचे निलेश मामडयाल ८) बागडपट्टीचा राजाचे सौरभ गोसाके ९) पुणे पद्मशाली क्रिकेट संघाचे राजेश उपरपेल्ली १०) शिव कंट्रक्शनचे अक्षय बल्लाळ संघ मालक म्हणून लाभले आहेत. स्पर्धेसाठी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे,
तरी क्रीकेट प्रेमींनी हे सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापद्मसेनेच्या वतीने करण्यात आले आहे. हि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शंकर जिंदम, अमोल येनगंदुल, रवि दंडी, विनोद बोगा, रोहिदास बुरम, राजेंद्र इगे, उदय सुरम, विनोद बुरा, किरण वल्लाकट्टी, विनीत बुरला, अमित बिल्ला, अमोल बिज्जा, संजय बोगा, रमेश गाजुल, प्रविण शिरापुरी, दर्शन येमुल, गोविंद नामन, दिपक बुरला, निलेश गंगुल, प्रविण बुरा, अभिजीत येनगंदुल, गोपाल न्यालपेल्ली, रोहन गुंडू, गितेश सादुल, अक्षय दुस्सा, रोहित अलवाल, आनंद येनगंदुल, प्रणव बोगा, रमेश आकुबत्तीन, पंकज धेंड, अक्षय संभार, शुभम अंकारम, प्रथमेश बोगा, गणेश इपलपेल्ली, विष्णु रायपेल्ली, विक्रांत ताडला आदि विशेष परिश्रम घेत आहेत.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com