स्नेह-75 च्यावतीने जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा परिवाराचा सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी) - पुर्वीची एकत्र कुटूंबपद्धती नष्ट होत असून आज चौकनी कुटूंब पद्धती रुजू होत आहे. त्यामुळे नात्यातील दुरावा निर्माण होत आहे. आज नोकरी, व्यवसाय यानिमित्त कुटूंबातील सदस्य विभक्त होत आहे. त्यामुळे मानसिक, शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकत्रित कुटूंबामुळे प्रत्येकाचे सुख-दु:ख हे वाटून घेतली जात होती. त्यामुळे एकत्रित कुटूंब ही सुखी आणि समृद्ध होती.
आजही अनेक परिवारात एकत्रित कुटूंब संस्कृती टिकून आहेत. नोकरी-व्यवसायिनिमित्त जरी बाहेर असलो तरी सण-उत्सवानिमित्त सर्व कुटूंबाने एकत्रित आले पाहिजे, त्यातून मिळणारी ऊर्जा ही दीर्घकाळ टिकून राहते. आज जागतिक कुटूंब दिनानिमित्त शर्मा कुटूंबाचा सन्मान एकत्रित कुटूंब व्यवस्था मजबूत करणारा आहे, असे प्रतिपादन विरेंद्र शिंदे यांनी केले.
जागतिक कुटूंब दिनानिमित्त स्नेह-75 चे वतीने शर्मा कुटूंबाचा सन्मान करण्यात आला. यावेळी गुलाब गोरे, प्रमोदकुमार छाजेड, सुवर्णा शिंदे, शर्मा परिवार मधील जेष्ठ हिरालाल शर्मा, गंगाबाई शर्मा, रमन शर्मा, उमा शर्मा, अनिल शर्मा, योगिता शर्मा, संतोष शर्मा, मनीषा शर्मा, यश शर्मा देविका शर्मा, वेदांत शर्मा, गौतम शर्मा आदी उपस्थित होते.
नगरमधील शर्मा कुटुंब हे तीन पिढ्यांपासून पासून एकत्र राहतात. आजच्या काळात ही आनंदाची बाब आहे. या परिवाराचा आदर्श घ्यावा, असे आवाहन विरेंद्र शिंदे यांनी केले. प्रास्ताविकात गुलाब गोरे म्हणाले, शर्मा परिवार सुशिक्षित असून सर्व सदस्य उद्योग, व्यवसाय, शेती करून पुढील पिढीला प्रेरणा देत एकत्र कुटुंब पद्धती जोपासायला हवी हा संदेश देत आहे.
यावेळी हिरालाल शर्मा यांनी सांगितले की आमची ही तिसरी पिढी आहे माझी मुलं, नातवंडं, त्यांची मुलं असा मोठा परिवार एकत्र असून एक विचार, एकमताने, राहतात यामुळे सर्वांचे सुख दुःख एकमेकांना समजतात. ग्रामीण भागात आता एकत्र कुटुंब पद्धती नष्ट होत आहे याचे वाईट वाटते. एकत्र कुटूंब पद्धती जीवनात आनंद देणारी कुटूंब पद्धत आहे. आमच्या नंतरही आमचेही हे मूलं, नातवंडे एकोप्याने राहतील असा विश्वास व्यक्त केला. शेवटी प्रमोदकुमार छाजेड यांनी आभार मानले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com