अहमदनगर शहरात वाढला गुन्हेगारांचा पसारा ; बाकी राहिला नाही पोलिसांचा दरारा
अहमदनगर शहरातील जुने न्यायालयात वकिलांच्या पक्षकारानेच वकिलावर धारदार शस्त्राने हल्ला केला अहमदनगर शहर आणि परिसरात गुन्हेगारी आणि गुंडांची दहशत आणि बंदूक,कट्टे तसेच तलवारीचा वापर करून मागील काही महिन्यांपासून क्राइम रेट आणि गुंडगिरी आलेख वाढलेला आहे पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे. पोलीस आणि कायद्याचे धाक भीती आणि कायदा हातात घेणाऱ्या गुन्हेगारांना तुरुंग आणि शिक्षा काय असते आणि पोलीस खाक्या दाखविल्यावर काय होऊ शकते हे आता शहरात परत सिद्ध करणे अत्यावश्यक झाले आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडविणारे सर्वच गुन्हेगार त्यात सामान्य गुन्हेगार,राजाश्रित गुन्हगार ,राजकीय गुन्हेगार आणि गुंड प्रवृत्तीचे सुरवात करणारे ज्यांना अजून मिशाही उगवल्या नाही असे नवयुवक गुन्हेगार वाढीस लागले असून पोलीस अधीक्षक यांनी ठरविले तर सर्व काही व्यवस्थित होऊ शकते आणि त्यामुळे तातडीने पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.
वकिलांना मारल्या प्रकरणाची माहिती पुढील प्रमाणे
अॅड. मयूर अशोक कोल्हे व त्यांचे वडील अॅड. अशोक कोल्हे कामकाजा निमित्ताने शहरातील जुन्या न्यायालयात आले होते. न्यायालयाच्या आवारात असताना त्यांचा पक्षकार अनिल गायकवाड याने कारण नसताना तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणुन हातात असलेल्या धारधार शस्त्राने त्यांच्यावर वार केले. अॅड. कोल्हे यांच्या डाव्या गालावर तसेच डोक्याला गंभर दुखापत झाली आहे. वकिलांनी व परिसरातील स्थानिक नागरिकांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गुन्हे शोध पथकाने आरोपीस बोल्हेगाव परिसरातून ताब्यात घेतले
कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रताप दराडे व पथकाने घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकाचे सपोनि योगिता कोकाटे, पो.कॉ. तानाजी पवार, सुरज कदम, सुजय हिवाळे यांना घटनास्थळी पाठवून आरोपीस ताब्यात घेण्याचे सांगितले. पथकाने घटनेची माहिती माहिती घेतली. अॅड. अशोक कोल्हे यांचेवर हल्ला करणारा त्यांचा पक्षकार असुन अनिल लक्ष्मण गायकवाड (रा. हनुमान मंदीराचे पाठीमागे, गांधीनगर, बोल्हेगाव) असल्याचे समजले. आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने तो पळुन गेला तर लवकर मिळून येणार नाही याकरिता पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या आदेशाप्रमाणे गुन्हे शोध पथकाने आरोपीस बोल्हेगाव परिसरातून ताब्यात घेतले.
सदर घटणेबाबत अॅड. अशोक कोल्हे यांचा मुलगा अॅड. मयूर अशोक कोल्हे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात अनिल लक्ष्मण गायकवाड याचे विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सपोनि योगिता कोकाटे करित आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अहमदनगर शहर विभाग अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पो. कॉ.तानाजी पवार, पो.कॉ. दिपक रोहोकले, सत्यजित शिंदे, सुरज कदम, सुजय हिवाळे यांनी केली आहे.
कायद्याची सेवा करणार्यांवर होणारे हल्ले अतिशय चिंताजनक
नगर येथे न्यायालयाच्या आवारातच अॅड अशोक कोल्हे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर नगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांनी भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. काही दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे राहुरी येथील अॅड राजाराम आढाव व त्यांच्या वकील पत्नी यांची हत्या करण्यात आल्याचे प्रकरण घडले होते. कायद्याची सेवा आणि रक्षण करणार्यांवर अशा पद्धतीने होणारे हल्ले अतिशय चिंताजनक असल्याचे पदाधिकार्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार नीलेश लंके, माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अॅड. सुरेश लगड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com