Ahmednagar OBC: अहमदनगर शहरात 6 मे ला महायुतीचा ओबीसी मेळावा
अहमदनगर (प्रतिनिधी) - दक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ जनतेचा अत्यंत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. वेगवेगळ्या भागात प्रत्येक घटकांचे मेळावे होत आहे महिलांचे मेळावे होत आहे. अहमदनगर शहरात ओबीसी व भटक्या विमुक्त मोर्चाचा मेळावा ६ मे रोजी दातरंगे मळा येथील मार्कंडेय संकुल येथे संपन्न होणार आहे.भारतीय जनता पार्टीने ओबीसी समाजाच्या विकासासाठी जे काही काम केले आहे.
ते समाजापर्यंत पोहोचावे.मेळावा यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा समावेश करून सर्व वेगवेगळ्या समाजातील सर्व जातीतील सर्व पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. यासाठी आज नियोजन बैठक संपन्न झाली आहे.मेळावा यशस्वी करण्यासाठी ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले यांनी केले आहे.
रंगारगल्ली येथे महाले मंगल कार्यालय येथे ६ मे रोजी होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओबीसी भटक्या विमुक्त मोर्चाचे मेळाव्याची नियोजन बैठक भाजपा ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले,नाभिक समाजाच्या अनिल निकम,मनसेचे शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, अनिता दिघे,सुधाकर आव्हाड,निशांत दातीर,बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष माऊली मामा गायकवाड,अनिल इवळे,मच्छिंद्र बनकर,भटक्या विमुक्त आघाडीचे संदीप कुसळकर,सोनार समाजाचे गोपाल वर्मा,
परीट समाजाचे विनोद गायकवाड, जालिंदर बोरुडे,सुमित वर्मा,वकील आघाडीचे अध्यक्ष चंदन बारटक्के ,शेषराव फुंदे, पद्मशाली समाजाचे सुमित इप्पलपेल्ली, गणेश कानगावकर,साळी समाजाचे सचिन पावले, सतीश रासने, दीपक देहेरेकर, धोबी समाजाचे राजेंद्र शिरसाठे,
श्रीकांत फंड, दत्ता गाडळकर, अँड.राहुल रासकर, माळी महासंघाचे गणेश बनकर, राजेंद्र एकाडे, शिवसेनेचे युवा आघाडीचे महेश लोंढे,शुभम काकडे,ओंकार लेंडकर,काशी कापडी समाजाचे सुनील भिंगारे,राजू वाडेकर, अधिवक्ता परिषदेचे सुनिल सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com