शंकर सावली मठात हनुमान चालीसा संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी) - माळीवाडा येथील ब्राह्मण गल्लीतील शंकर सावली मठात शंकर महाराजांच्या ७७ वा समाधी सोहळ्या निम्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये श्री रामभक्त हनुमान सत्संग मंडळ ट्रस्ट प्रस्तुत हनुमान चालीसा व भजनसंध्या कार्यक्रम संपन्न झाला
मठासमोर आयोजलेल्या या सामुहिक हनुमान चालीसा पाठ संपन्न झाली व भजन संध्याने शंकर महाराजांच्या नामाने परिसर दुमदुमन गेला होता यावेळी हनुमान चालीसाच्या गायनाने कार्यक्रमात रंगला .तर भाविकांनी सामुदायिक पठणात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व भजन संध्यात भाविक तल्लीन झाले होते. विविध देवतांची स्तुतीपर भजने संपन्न झाली
या कार्यक्रमास मोठ्या संख्नेने शंकर भक्त ,परिसरातील भाविक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व राजकीय नेते,कार्यकर्तेनागरिक उपस्थित होते हनुमान चालीसा कार्यक्रमानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली
४ दिवसीय या कार्यक्रमात सामुदायिक शंकर गिता पारायण सोहळासंपन्न झाला दुसऱ्या समाधी दिनी पालखी छबिना सोहळा होणार असून गुरुवारी संध्याकाळी महाप्रसाद म्हणून आगडगाव ची आमटी व भाकर चे जेवण ठेवण्यात आले आहे तरी भाविकांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आले आहे
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com