Drawing Competition: वयाच्या ७७ व्या वर्षी पात्रे सरांनी स्पर्धेत भाग घेऊन केले पेंटिंग
अहमदनगर (प्रतिनिधी) - गेल्या अनेक वर्षापासून शासनाच्या धोरणानुसार चित्रकला शिक्षक शाळेमधून बाहेर गेले आहे ,त्यामुळे येणाऱ्या नव्या पिढीला विद्यार्थ्यांना कार्यानुभव ,चित्रकला ,शिल्पकला याचे ज्ञान राहिले नाही व ही सर्व पिढी डिजिटल युगात वावरत आहे.पण जुन्या पिढीतील नामवंत चित्रकला शिक्षक बाळकृष्ण पात्रे यांनी 77 व्या वर्षी साईबन दुसरे बालपण आनंद उत्सव स्पर्धा मध्ये शिवनेरी प्रभात शाखा व जेष्ठ नागरिक संघ,स्टेशन परिसर यांच्यावतीने स्पर्धेत भाग घेऊन आपली रेषेची कला हा विषय सादर केली.
यामध्ये त्यांना पत्नी अनिता पात्रे व नातू ने मदत केली.त्यांनी टाकाऊ वस्तु पासून एक थ्रीडी चित्र बनवले जे समोरून पाहिले तर मनशांतीसाठी ध्यान योग करणारा गृहस्थ दिसतअसून डाव्या बाजूने पाहिले तर एकच माणूस घरात असून घरात कोणीही नाही व त्याला श्रीमंत असूनही आनंद घेता येत नाही तर उजव्या साईडला पाहिले तर एकत्र आनंदी कुटुंब दिसत आहे.
यावेळी त्यांनी मोठ्या शीटवर एकत्र कुटुंब पद्धतीवर चित्र रेखाटून दाखवले. हाताने काढलेल्या चित्राला कलाकृतीला सन्मान मिळावा यासाठी त्यांनी स्पर्धेत भाग घेतला होता ते म्हणाले आजची मुल ही डिजिटल चित्र काढतात व पेंटिंग करतात त्यामुळे त्यांना पेंटिंगचा आनंद मिळत नाही,सध्या वॉल पेंटिंग पुन्हा सुरु झाले असून भविष्यात पुन्हा हाताच्या पेंटिंगला,चित्रकलेला चांगले दिवस येणार आहेत.
मानकन्हैय्या ट्रस्ट आयोजित साईबन बालपण आनंदउत्सव स्पर्धा 2024 मध्ये वय वर्षे 55 च्या पुढील व्यक्तींनी मन:शांतीचा मार्ग कौटुंबिक एकतेतून जातो यावर आपली कला सादर करावयाची होती त्यामध्ये त्याच्या या कलाकृतीचे प्रा.मधुसुदन मुळे,पी डी कुलकर्णी जयंत येलूलकर,संयोजक डॉ.प्रकाश कांकरिया, डॉ.सुधा कांकरिया आदींसह अनेकांनी कौतुक केले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com