महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
मुंबई, दि. १ : महाराष्ट्र राज्याच्या ६५ व्या स्थापना दिनानिमित्त मुंबई शहरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संजय यादव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपजिल्हाधिकारी एकनाथ नवले, जिल्हा नियोजन अधिकारी गुलाबदास सुपेकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी उपस्थित ज्येष्ठ नागरिक, स्वतंत्र सेनानी, नागरिक, अधिकारी, कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळातील कार्यरत सुरक्षा रक्षकांना त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी व मुंबई जिल्हा, महिला कारागृह विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना प्रोत्साहनात्मक मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com