प्रगत विद्यालयाचा शालांत परिक्षेचा 96.49 टक्के निकाल
गायत्री शिंदे विद्यालयात प्रथम
अहमदनगर (प्रतिनिधी) - नवीपेठ येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परिक्षेचा (इ.10वी) निकाल 96.49 टक्के लागला. विद्यालयात गायत्री पवन शिंदे ही 85.80 टक्के मिळवून प्रथम आली. द्वितीय - रिया रणजित जव्हेरी (82.20%), तृतीय - महेक वाजिद पठाण (81.40%) मिळून यशस्वी झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणारे सर्व शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा विजया रेखे, सचिव सुनिल रुणवाल, उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी, खजिनदार व विद्यालयाचे चेअरमन उमेश रेखे, कार्य.सदस्य किरण वैकर, महेश रेखे, उदयकुमार भणगे, माजी अध्यक्ष दि.ना.जोशी, प्राचार्य सुनिल पंडित, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा धरम, सुनिल गाडगे, जयमाला भोरे, दिलीप रोकडे, अनिता सरोदे, विजय गरड, सोनाली गाजूल व सर्व शिक्षक-शिक्षकेतर वृंदांनी अभिनंदन केले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com