प्रगत विद्यालय व वि. ल. कुलकर्णी शाळेस रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शनीच्या वतीने दोन टॉयलेट
अहमदनगर (प्रतिनिधी) - येथील दि प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे प्रगत माध्यमिक व उच्च माध्यमिक व कै वि .ल . कुलकर्णी विद्यालयास रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शनी यांच्यावतीने श्रीगोपाल रामनाथ धूत फाउंडेशन अहमदनगर यांच्या सीएसआर फंडातून दोन फायबरचे टॉयलेट प्रदान करण्यात आले. यावेळी सोसायटीचे सेक्रेटरी सुनील रुणवाल, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती विजयाताई रेखे, फाउंडेशनच्या प्रमुख प्रतिभा धूत, प्रियदर्शनीच्या अध्यक्षा सौ. देविका रेले, भाजपच्या सौ.गिता गिल्डा, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कुलकर्णी, कार्यकारणी सदस्य किरण वैयकर, प्राचार्य सुनिल पंडित, मुख्याध्यापिका प्रतिभा धरम, मुख्याध्यापिका सौ.जोशी आदी उपस्थित होते .
यावेळी प्रतिभा धुत म्हणाल्या की, समाजामध्ये काम करत असताना आपण नेहमी स्वच्छतेला महत्त्व दिले पाहिजे. आपल्या घरापासून आपल्या शाळेपर्यंत स्वच्छतेची सवय लावून घेतल्यास भविष्यात सामाजिक काम करताना आपण सर्वत्र स्वच्छतेला महत्त्व देऊ. प्लास्टिक पासून अनेक प्रकारचे वस्तू तयार करण्यासाठी प्लास्टिकचे संकलन करून त्यापासून बेंचेस व हतर उपयुक्त वस्तू तयार करण्यात याव्यात. जेणे करुन टाकाऊ पासून टिकावू वस्तू तयार होतील.
यावेळी देविका रेले म्हणाल्या, माझ्या या वर्षीच्या कार्यक्रमात रोटरीच्या माध्यमातून अनेक शाळांना अनेक प्रकारचे ग्रंथालयातील पुस्तकासह अनेक मदत केल्याचे विविध उपक्रम राबवल्याचे सांगितले.
सौ. गीता गिल्डा म्हणाले, श्रीगोपाल रामनाथ धूत फाउंडेशन हे अहमदनगर शहरातील एक वेगळे सामाजिक फाउंडेशन असून या फाउंडेशना मार्फत शहरातील टाकावू प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या गोळा करून त्यामध्ये प्लास्टिकचे सर्व वस्तू, कागद पिशव्या त्यामध्ये भरून त्यापासून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी या फाउंडेशनने बेंचेस बनविले. याच धरतीवर आपणही आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पाच हजार वाटल्या प्लास्टिकच्या वस्तूंनी प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी भरून दिल्यास आपल्याही शाळेला दिले जातील, असे जाहीर केले. तसेच लोकशाही मजबूत करण्यासाठी मुलांनी आपल्या पालकांना मतदानासाठी जागृत करून मतदान करण्यासाठी आवाहन करावे असे सांगितले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर वाल्मीक कुलकर्णी यांनीही या उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. ी सुनील रुणवाल यांनी संस्थेने 1975 पासून आत्तापर्यंत केलेल्या शैक्षणिक कार्याची माहिती देऊन संस्था आता लवकरच एक मोठ्या जागेमध्ये शैक्षणिक संकुल निर्माण करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.जोशी यांनी केले तर परिचय प्राचार्य सुनील पंडित यांनी करुन दिला. सूत्रसंचालन सौ. बंड यांनी केले तर आभार सौ. प्रतिभा धरम यांनी मानले. यानंतर रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शनी दिलेल्या दोन फायबर टॉयलेट चे उद्घाटन करण्यात आले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com