स्नेह-75-सायंतारा ग्रुपतर्फे कामगार दिन साजरा
अहमदनगर (प्रतिनिधी) - कष्ट हे प्रत्येकाला करावेच लागते. कष्टाशिवाय पर्याय नसतो. एखादा उदयोजक, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यवसायिक, दुकानदार हे सर्व आपल्या कामगारांच्या विश्वासावर व्यवसायात प्रगती करत असतात. कामगार हा व्यावसायिकांचा कणा आहे. अशा या कामगारांना रोजच मान-सन्मान दिला पाहिजे, असे प्रतिपादन श्रीकांत अष्टेकर यांनी केले.
1 मे महाराष्ट्र - कामगार दिनानिमित्त स्नेह-75 व सायंतारा ग्रुप च्या वतीने प्राथमिक स्वरुपात कामगारांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी श्रीकांत अष्टेकर, डॉ.अस्मिता अष्टेकर, डॉ.विनोद सोळंकी, सागर अष्टेकर, प्रमोदकुमार छाजेड, शोभा लोखंडे, किशोर खेमनार, हनुमान गायकवाड, पूजा पवार, झेबा शेख आदि उपस्थित होते.
कामगार दिनानिमित्त त्यांची डॉ.अस्मिता अष्टेकर व डॉ.विनोद सोळंकी यांनी आरोग्य तपासणी केली. या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले.
झेबा शेख यांनी सूत्रसंचालन केले तर प्रमोदकुमार छाजेड यांनी आभार मानले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com