Ahmednagar News: जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी नगर होणारच आणि मी करणारच -आमदार संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून भिस्तबाग चौकाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले.तर जिल्ह्याच्या नामांतरासाठी आग्रही भूमिका घेऊन राज्य सरकारने मंजुरी दिली आहे.या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, केंद्रात पुन्हा सरकार स्थापन झाल्यावर जिल्ह्याच्या नामांतरासाठी अहिल्यादेवी नगर या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची जिल्ह्याचे नामांतर अहिल्यादेवी नगर होणारच आणि मी करणारच असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
नगर मधील भिस्तबाग येथे दरवर्षी प्रमाणे सावेडीतील भिस्तबाग चौकात उत्कर्ष फाउंडेशन च्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी त्रिशताब्दी जयंती निमित्त सावेडी उपनगरात उत्कर्ष फाउंडेशन व विचार भारती संस्थेच्या संयुक्त विद्यमाने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रा चे स्वागत करण्यात आले.
यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष ,डॉ. अशोक भोजने,शारदाताई ढवण,संपतदादा बारस्कर,कलावती शेळके,बलभीम पठारे,निखिल वारे,डॉ.सागर बोरुडे ,दिपालीताई बारस्कर,बाळासाहेब पवार,सुनिल त्र्यंबके,मिनाताई चव्हाण,विनित पाऊलबुधे ,एन.ई.देशमुख,ज्ञानेश्
डोईफोडे साहेब,डॉ.योगेश विरकर,डॉ.गणेश पानसरे,डॉ.गुरुप्रसाद हंडाळ,डॉ.सचिन सोलट,डॉ.राहुल पंडीत,डॉ.अमित करडे,डॉ.सचिन लांडगे,डॉ. अविनाश गाडेकर,डॉ.सचिन पिसे, डॉ.यशवंत नजन,डॉ.परमेश्वर काळे,डॉ.दिलीप दाणी,आर्कि.चंद्रकांत तागड,प्रा. भगवान गवते,इंजि.डि.आर. शेंडगे, प्रा.बाळासाहेब शेंडगे,प्रा.एस.एस.वडिलके,अॅड.
इंजि.शेंडगे यांनी जिल्ह्याचे नामांतर ही अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीची सर्व समाजबांधवांना भेट ठरणार असून, जिल्ह्याचा नवीन इतिहास व अहिल्यादेवी होळकर यांच्या पराक्रमाची गाथा देशभर पसरणार असल्याचे सांगितले. यावेळी महिला मोठ्या संख्येने समाजबांधव व महिला उपस्थित होत्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com