जलतरण तलावाचा आणि मृत्यूचा कोणताही संबंध येत नाही
अहमदनगर (प्रतिनिधी) : रविवारी ता. २ जून रोजी सकाळी सव्वा सहा वाजता सागर कळसकर हे पोहण्यास आले त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा होता. सुमारे तासभर पोहोल्यानंतर उथळ भागामध्ये जिथे पाण्यामध्ये सूर मारण्यास मनाई आहे अशा चार फूट खोलीच्या पाण्यामध्ये कळसकर यांनी उडी मारली. तो बऱ्यापैकी सूर या स्वरूपात होता. तेव्हा त्यांची पोझिशन डोके खाली आणि पाय वर अशा पद्धतीने होती. त्यानंतर ते पाण्याखाली सुमारे एक मिनिट वीस सेकंदपर्यंत होते. एवढा वेळ तर पाण्यामध्ये खेळणारी तिकीटधारक आणि इतर लोक सतत थांबत असतात. परंतु शंका आल्याने इतर तिकीटधारकांच्या साहाय्याने आमच्या लाईफगार्डने त्यांना बाहेर काढले. तेव्हा त्यांची तब्येत खराब दिसून बेशुद्ध पडता आहेत असे वाटले.
त्या वेळेला आमच्या लाईफगार्डने त्यांना सीपीआर दिला आणि तिथे उपस्थित असलेल्या अन्य ७ लाइफ गार्डने वेगळेवेगळ्या प्रकारची मदतीची कामे केली, उदाहरणार्थ म्बुलन्सला फोन लावणे, इतर लोकांच्या साहाय्याने प्रथमोपचार देणे आणि त्याचबरोबर त्यांना आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये नेणे. हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या अगोदर आमच्या हॉलमध्ये प्रथमोपचार दरम्यान त्यांनी व्यवस्थित हालचाल करून रिस्पॉन्स दिला होता पण त्यानंतर हॉस्पिटलमध्ये नेल्यावर ऍडमिट करेपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली.
या सर्व घटनांच्या दरम्यान असे लक्षात येते की सदरील गृहस्थ जवळपास पाच फूट नऊ इंच उंचीच्या आसपास होते. तेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तीने उथळ पाण्यामध्ये सूर मारू नये हे उघड आहे. सीपीआर देताना त्यांच्या नाकातोंडातून कोणत्याही प्रकारचे पाणी बाहेर आले नाही यावरून पाण्यात बुडून मृत्यू होण्याची संभावना अजिबात नाही. त्याचबरोबर इतर लोकांनी सांगितल्यानुसार ते पट्टीचे पोहोणारे होते म्हणून अशी व्यक्ती बुडून मृत्यू होत नाही.
या दुर्दैवी अपघाताबद्दल आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत. पाण्यामध्ये उडी मारण्याचा निर्णय संपूर्णतः कळस्कर यांचा स्वतः चा होता. याला आमचे व्यवस्थापन किंवा आमचे कोणतेही कर्मचारी जबाबदार नाहीत. त्यांना पाण्यातून बाहेर काढून हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यापर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि ते संपूर्णतः प्रशिक्षित आहेत.
यावरून जलतरण तलावाचा आणि मृत्यूचा कोणताही संबंध येत नाही असे सिद्ध होते, अशी माहिती वाडिया पार्क जलतरण तलावाचे ठेकेदार संस्थेच्या वतीने गणेश कुलकर्णी यांनी दिली.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com