शालिनी विखेंच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सवाचे उदघाटन
अहमदनगर (प्रतिनिधी) -विचार भारती,अहिल्यानगर व उत्कर्ष फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सव २०२४ चे आयोजन माउली सभागृह, येथे करण्यात आले होते त्याचे उदघाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाले.
यावेळी उल्का गवते,इंजि.डी.आर.शेडगे,माजी महापौर बाबासाहेब वाकळे,चित्रपट निर्माते बलभीम पठारे,सुधीर लांडगे सह मोठ्या संख्नेने नगरकर उपस्थित होते
सौ विखे यावेळी बोलताना म्हणाल्या नगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव मिळाल्यानंतर हा त्यांच्या नावाने पहिला महोत्सव होत आहे,तो दरवर्षी होत जाईल,आज अहिल्यादेवींचे नाव घेतले कि आपल्या डोळ्यासमर चोंडीचा त्यांचा जन्म,त्यांनी केलेले काम त्यांनी बांधलेल्या धर्मशाळा, मंदिरे, घाट , विहिरी, बारव डोळ्यासमोर येतात
पण एक महिला म्हणून अनेक संकटे त्यांच्यावर आली,तरी त्या संकटांचा विचार न करता पुरोगामी विचार फेकून देऊन त्या जीवन जागल्या व संकटाना सामोरे जाऊन धैर्य दाखवले व कर्तृत्व सिद्ध केले असेही त्या म्हणल्या
उद्घाटना नंतर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com