अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेला 11 कोटी 48 लाख ढोबळ नफा- चेअरमन रामेश्वर चोपडे
अहमदनगर (प्रतिनिधी) - शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुरूमाऊली मंडळाच्या संचालक मंडळाने अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत 2016 पासून काटकसरीच्या व सभासद हिताच्या कारभाराची परंपरा कायम राखत 2023-24 या आर्थिक वर्षी सभासदांना 7 टक्के प्रमाणे 13 कोटी 96 लाख रूपये कायम ठेवीवर व्याज पेड करून 11 कोटी 48 लाख रूपयाचा ढोबळ नफा झालेला आहे.
मागिल आर्थिक वर्षात कर्जाचा व्याजदर कमी केल्याने उत्पन्न कमी होऊन व आर्थिक वर्षात 162 कोटीने विक्रमी ठेवीत वाढ होऊनही 11 कोटी 48 लाख ढोबळ नफा झाला व 3 कोटी 21 लाखाची तरतूद करूनही 8 कोटी 27 लाखाचा नफा झाला. यावर्षी सभासदांना 7 टक्के प्रमाण लाभांश देण्याची शिफारस मा.संचालक मंडळाने केली, अशी माहिती शिक्षक बँकेचे चेअरमन रामेश्वर चोपडे यांनी दिली.
31 मार्च 2024 अखेर बँकेचे एकूण 10579 सभासद असून बँकेचे वसूल भाग भांडवल 80 कोटी 96 लाख रूपये आहे. सर्व फंडस् (निधी) 35 कोटी 9 लाख असून एकूण ठेवी 1458 कोटी 89 लाखाच्या आहेत. तर बँकेचे कर्ज वाटप एकूण 1067 कोटी 10 लाख रूपये आहे. बँक आपल्या सभासदांना 41 लाख रूपये पर्यंंत कर्ज वाटप करते. बँकेत वेगवेगळया योजना राबविल्या जात असून मागिल आर्थिक वर्षामध्ये सभासद कल्याण निधी मधून सभासदांच्या मुला- मुलींचे लग्नासाठी शुभमंगल योजने अंतर्गत 11 हजार रूपये प्रमाणे 304 सभासदांना 33 लाख 44 हजार रूपयाचे वाटप करण्यात आले.
वैद्यकीय बिलापोटी मदत म्हणून 65 सभासदांना 12 लाख 10 हजार रूपये देण्यात आले आहे. तसेच बँकेच्या सभासद कर्ज निवारण निधी योजने अंतर्गत 41 लाखापर्यंत मयत सभासदाचे कर्ज माफ केले जाते. या आर्थिक वर्षात 21 मयत सभासदांचे एकूण 3 कोटी 37 लाख 27 हजार रूपयांचे कर्ज माफ केले आहे़ तसेच कुटुंबआधार निधी योजनेमधून मयत सभासदाचे वारसास 15 लाख मदत दिली जाते.
या वर्षात 34 मयत सभासदाचे वारसास 4 कोटी 5 लाख मदत पेड करण्यात आली. चालू आर्थिक वर्षापासून सेवानिवृत्त होणार्या सभासदांना कुटुंब आधार निधी योजनेतून 11 हजाराप्रमाणे कृतज्ञता निधी सुरू झाल्याने या आर्थिक वर्षात 22 सभासदांना 2 लाख 42 हजार वाटप करण्यात आले. सभासदांना जास्तीत जास्त सेवा़ सुविधा पुरविण्यासाठी बँकेचे संचालक मंडळ व सर्व कर्मचारी कटीबद्ध आहे, असे व्हा.चेअरमन श्रीमती निर्गुणा बांगर म्हणाल्या.
यावेळी संचालक सर्वश्री संदीप मोटे, कैलास सारोक्ते, बाळासाहेब तापकीर, संतोष राऊत, सुर्यकांत काळे, कारभारी बाबर, महेंद्र भणभणे, गोरक्षनाथ विटनोर, शिवाजी कराड, कल्याण लवांडे, ज्ञानेश्वर शिरसाठ, माणिक कदम, शशिकांत जेजूरकर, भाऊराव राहिंज़, बाळासाहेब सरोदे, आण्णासाहेब आभाळे, रमेश गोरे, योगेश वाघमारे, विठ्ठल फुंदे, श्रीमती सरस्वती घुले आदी उपस्थित होते.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com