गोपीनाथ मुंडे जयंती आणिशिवाजीराव शेलार स्मृतिदिना निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
नगर-स्व.लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती आणि स्व.शिवाजीराव शेलार(अण्णा) यांच्या स्मृतिदिना निमित्त भारतीय जनता पार्टी,नगर,जय बजरंग ग्रुप,शिवराजे रुद्रा युवा ग्रुप,सूर्यनगर यांच्या वतीने बालघर प्रकल्प तपोवन रोड येथे फळ वाटप कार्यक्रमचे व जनकल्याण रक्तपेढी नगर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर आयोजन करण्यात आले होते
कार्यक्रमाच्या प्रारंभी गोपीनाथ मुंडे,शिवाजीराव शेलार,खा दिलीप गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक निखिल वारे, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन शेलार,उद्योजक किशोर वाकळे,अनिल ढवण,राजूभाऊ बुधवंत, बंटी ढापसे,आयोजक कैलास गर्जे,मल्हारी दराडे,निलेश भगत,बालघरचे संचालक युवराज गुंड,गणेश कुसळकर,महेंद्र कुसळकर,प्रताप बटुळे,संतोष गर्जे,जनकल्याण रक्तपेढीचे डॉ ओजस मुनोत, शरद बडे, ऋतिक कसणे,ओंकार झोडगे ,आकाश सोनवणे,अतुल गीते आदींसह मोठ्या संख्नेने कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते
निखिल वारे यावेळी बोलताना म्हणाले गोपीनाथ मुंडे हे खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणातील गुरु होते दुर्लक्षित घटकाकडे लक्ष दिले पाहिजे हाच त्यांचा विचार होता आणि त्याच अनुषंगाने आजचा हा बालघर प्रकल्प मध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे ,याबद्दल मी आयोजकांचे कौतुक करत आहेत . गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रातील दुर्लक्षित घटक,भटका समाज, ऊस तोडणी कामगारांना मुख्य प्रवास आणले. तर शिवाजी शेलार यांनी ज्यावेळेस सावेडी भागामध्ये शाळांमध्ये प्रवेशासाठी डोनेशन द्यावे लागत होते ,त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी शाळा सुरू करून गरीब मुलांना शिक्षणाचे द्वार खुले करून दिलेत ,कायम लोकांना मदत करणारे त्यांचे प्रश्न सोडवणारे असे शिवाजी अण्णा शेलार होते असे हे दोन महान नेते होते. आपल्या सर्वांचे लाडके जय बजरंग विद्यालयाचे संस्थापक. भारतीय जनता पक्षाचे तीन वेळेचे भटके विमुक्त जाती प्रदेशाध्यक्ष,अखिल महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष .शिवाजीराव शेलार साहेब यांचा पुण्यतिथीनिमित्त व मुंढे साहेबांच्या जयंती निम्मित विनम्र अभिवादन करतो
यावेळी अनेक युवकांनी रक्तदान केले तर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com