Top News

Nagar Manpa | नगर मनपा निवडणूक : पराभवातही विश्वासाचा विजय

Nagar Manpa | नगर मनपा निवडणूक : पराभवातही विश्वासाचा विजय


Nagar Manpa | नगर मनपा निवडणूक : पराभवातही विश्वासाचा विजय





 अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 12 मधून अलतमश सलीम जरीवाला यांना मिळालेले मत हे निश्चितच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरले आहे. कोणत्याही पक्षाच्या मोठ्या नेत्यांचा पाठिंबा नसताना, पक्षाची संघटनात्मक ताकद किंवा कोणतीही धनशक्ती न वापरता केवळ आपल्या कामाच्या जोरावर नागरिकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम आणि विश्वास दाखवला, हे या निवडणुकीचे खरे यश आहे.



जरी निवडणुकीत विजय मिळाला नसला, तरी शहरभर अलतमश जरीवाला यांच्या कामगिरीचे आणि प्रामाणिक संघर्षाचे खुलेपणाने कौतुक होत आहे. रस्त्यांच्या कामासाठी वेळोवेळी आंदोलने उभारून ती कामे पूर्ण करून घेणे, नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे, पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या सोडवण्यासाठी नागरिकांसोबत उभे राहणे—अशा अनेक मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी न थकता काम केले. याच कामांची पावती मतदारांनी मतांच्या माध्यमातून दिली आहे.



निवडणूक प्रचाराच्या काळात अल्तमश जरीवाला यांचे वडील सलीमभाई जरीवाला यांना पायाला दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे प्रचारावर मोठा परिणाम झाला आणि प्रचार काहीसा थंडावला. तरीसुद्धा मतदारांनी परिस्थितीपेक्षा कामाला महत्त्व देत अलतमश जरीवाला यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला.



गेल्या ४० वर्षांपासून सत्तेच्या बळावर निवडून येणाऱ्या समोरच्या उमेदवाराला थेट आव्हान देत अलतमश जरीवाला यांनी जनतेच्या ताकदीवर राजकीय भूकंप घडवला. कोणतीही धनशक्ती, सत्ता किंवा परंपरागत राजकीय वारसा नसताना दोन हजार पेक्षा अधिक मताधिक्य मिळवणे ही केवळ निवडणूक नसून, जनतेने अन्याय व मक्तेदारीला नाकारत सुशिक्षित, अभ्यासू आणि कृतिशील नेतृत्वाला दिलेली ठाम संधी असल्याचे शहरात व जिल्ह्यात बोलले जात आहे.


ही निवडणूक एक गोष्ट ठामपणे सांगून जाते—राजकारणात पैसा, शक्ती किंवा मोठी नावे नाही, तर लोकांच्या जीवनात केलेले खरे कामच टिकते. पराभव असूनही मिळालेले हे प्रेम, विश्वास आणि  नागरिकांचा आधार हा भविष्यातील लढ्यासाठी नवी ऊर्जा देणारा आहे.


लढा थांबणार नाही सेवा सुरूच राहील आणि नागरिकांच्या विश्वासावरच पुढचा प्रवास ठरेल असे पत्रक अल्तमश जरीवाला यांनी प्रसिद्ध करत मतदारांचे आभार मानले .






Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने