भाग्योदय विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
नगर : दर्शक
आपला भारत देश जगातील एक मोठी लोकशाही असून आपल्या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. समाजावर आधारित शैक्षणिक धोरणाची शिक्षण व्यवस्था आणण्यासाठी सर्व शाळा, कॉलेज व महाविद्यालयांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
शिक्षण व्यवस्थेतील चुकीच्या धोरणांमुळे भारतात सर्वाधिक सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढली आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाली तरच आपण विकसित राष्ट्र बनू शकतो. यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी मोठी स्वप्ने पाहावीत,
विद्यार्थी महत्त्वाकांक्षी असला पाहिजे तरच तो प्रगती करू शकतो आणि आपल्या क्षेत्रात आयकॉन बनला पाहिजे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी केले.
ते भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भानुदासजी कोतकर, संस्थेचे संचालक रघुनाथ लोंढे, प्रसाद आंधळे, सागर सातपुते, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, रेणुका माता प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बन्सी नरवडे, जयद्र खाकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com