Ahmednagar College | अहमदनगर महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना ' उत्कृष्ट विद्यार्थी ' पुरस्कार
Ahmednagar College |
नगर : दर्शक ।
जैवतंत्रज्ञान विभागातील पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या कु. शुभांगी उत्तम भांड आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या यश गायकवाड या दोन्ही विद्यार्थ्यांना मायक्रोबायोलॉजी सोसायटी, इंडीया या संस्थेमार्फत ' उत्कृष्ट विद्यार्थी ' पुरस्कार प्रदान करण्यात आला.
विद्यार्थाचे विविध अंगी कौशल्य, शैक्षणिक गुण इत्यादी लक्षान घेवून हा पुरस्कार विद्यार्थ्यांना देण्यात आला.
दरवर्षी जैवतंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीमधुन नोकरीच्या संधीही उपलब्ध केल्या जातात. सिरम लाईक सायन्सेस, बातार कॅन्सर जेनेटिक्स, रिलायन्स लाइक लायन्ससेस या सारख्या उच्च दर्जाच्या संशोधन करणाऱ्या कंपन्यांमध्ये मुलांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.
जैवतंत्रज्ञान क्षेत्र है भविष्यातील एक महत्वाचे क्षेत्र ठरणार आहे. ज्यामधे विविध आजारांवर नवीन संशोधन करून उपचार तसेच उपचार पद्धतीचे संशोधन करण्यात येते. बारावी शिक्षणानंतर मुलांनी बी.एस. सी बायोटेक्नॉलॉजी हा कोर्स घेणे करिअरसाठी उत्तम राहील असे. जैवतंत्रज्ञान विभागाचे समन्वयक डॉ. सनी रूपवते यांनी सांगीतले. दोन्ही विद्यार्थ्यांचा सत्कार महाविद्यालयांचे प्रभारी प्राचार्य डॉ. नोएल पारगे यांनी केला.
विद्यार्थ्यांना या यशासाठी विभागातील प्रा. राजश्री भोपे, प्रा. प्रशांत कटके, प्रा. आधीता गव्हाने, प्रा. ज्योत्सना गलांडे यांचे मार्गदर्शन लाभले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com