जिल्हा काँग्रेसच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नगर - तुम्ही जर शिकले तरच ताठ मानाने जगताल, तुम्ही जर संघटित होऊन आपल्यावरील अन्यायाला विरोध केला तरच न्याय मिळेल, पण संघर्ष करतांना आज माणसुकी मिळवून देण्यासाठी संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, डॉ.बाबासाहेबांचा हा संदेश कृतीतून साकारण्याची खरी गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ यांनी केले.
जिल्हा काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्ड येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष जयंतराव वाघ, प्रदेश सचिव दिप चव्हाण, मागासवर्गीय विभागाचे प्रदेश सरचिटणीस सुनील क्षेत्रे, बाळासाहेब भंडारी, निजाम जहागिरदार, भिंगार शहर काँग्रेस अध्यक्ष सागर चाबुकस्वार, युवक शहर जिल्हाध्यक्ष मोसिन शेख, नलिनी ताई गायकवाड, उषाकिरण चव्हाण, मंदाताई पोळ, समीर शेख, नईम सरदार, संतोष लोंढे, अभिजित कांबळे, सुभाष आल्हाट , राजेंद्र कर्डिले,अभिनय गायकवाड, इंजि.सुजित क्षेत्रे,आर्किटेक्ट प्रकाश थोरात आदींसह इतर पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.*
0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com