शिवसेना संपर्क प्रमुख दिलीप सातपुते मित्र मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण लीला कथा वाचन कार्यक्रमाचा उद्यापासून प्रारंभ
नगर : दर्शक ।
नगर - केडगाव भूषण नगर या ठिकाणी शिवसेना संपर्कप्रमुख दिलीप सातपुते मित्र मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण लीला कथा वाचन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वैराग्यमूर्ती केशव महाराज उखळीकर यांच्या सुश्राव्यवाणीतून या कार्यक्रमचा दि.26 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे.
दिनांक 26 एप्रिल 2025 ते शुक्रवार दि. 9 मे 2025 या कालावधीत सायंकाळी 6 ते 9 या वेळेमध्ये हा कार्यक्रम पार पडणार असून दररोज महाआरतीनंतर महाप्रसादाचा देखील वाटप होणार असल्याची माहिती शिवसेना संपर्कप्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.
श्रीकृष्ण लीला कथा वाचन कार्यक्रमासाठी भव्य दिव्य मंडप उभारण्यात आले असून आकर्षक सजावट करण्यात आली. आकर्षक विद्युत रोषणाई करून परिसरात भगवान श्रीकृष्णाचे मोठमोठे बॅनर लावण्यात आले आहे. यावेळी कथा वाचनाचा प्रसारण भाविकांना दिसावे यासाठी मंडपात विविध ठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात आले. भाविकांना पाण्याची व्यवस्था आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. दिलीप दादा मित्र मंडळाच्या वतीने अनेक उपक्रम वर्षभरात राबवण्यात येतात.
यापूर्वी सुद्धा भूषण नगर मध्ये जंगले महाराज शास्त्री, रामरावजी ढोक महाराज, संजय महाराज पाचपोर, चकलांबा देवस्थानच्या सोनाली दीदी यांचे कार्यक्रम सुद्धा यशस्वी पार पाडले.
यावेळी बोलताना संपर्कप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, कथा वाचन हा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नाही, तर तो एक अध्यात्मिक प्रवास आहे. या कथांमधून आपल्याला नीतिमूल्यं, भक्तीचा अर्थ, आणि जीवनातील अडचणींवर मात करण्याची प्रेरणा मिळते. श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेली कर्मयोगाची शिकवण आजही प्रत्येकासाठी उपयुक्त आहे.
या कार्यक्रमामुळे आपल्याला आपल्या परंपरांशी नाते जपता येते, तसेच नव्या पिढीलाही आपल्या संस्कृतीची ओळख करून देता येते. याउद्देशानेच केडगाव, उपनगरासह अहिल्यानगर शहरातील नागरिकांना श्रीकृष्ण लीला कथा वाचनातून प्रभू श्रीकृष्ण काय होते हे कळवे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या कथा वाचन कार्यक्रम आणि महाप्रसादाचा भावी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा. असे आवाहन शिवसेना संपर्कप्रमुख दिलीप दादा सातपुते मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले.

0 टिप्पण्या
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com