Top News

Aimim Nagar | रविवार 11 जानेवारीला असदुद्दीन ओवैसी नगर मध्ये

 रविवार 11 जानेवारीला असदुद्दीन ओवैसी नगर मध्ये 

Aimim Nagar | रविवार 11 जानेवारीला असदुद्दीन ओवैसी नगर मध्ये



नगर : दर्शक 
महाराष्ट्रात होणाऱ्या महानगर पालिका निवडणुकीत सर्वच पक्षाने उमेदवार उभे केले असून चांगल्या चांगल्या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महाराष्ट्रातील झालेल्या नगर पालिका नगर परिषद निवडणुकीत ज्या प्रकारे एम आय एम पक्षाने कामगिरी केली आणि १ नगर अध्यक्ष आणि ८३ नगरसेवक निवडून आणले. 


त्यामुळे एम आय एम पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तयांचा मनोबल वाढला आहे.पक्षाची कामगिरीत ज्या प्रकारे प्रगती होत आहे त्यामुळे महानगर पालिका निवडणुकीत एम आय एम पक्षाचा सिंहाचा वाटा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 



पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दिन ओवैसी हे आता महाराष्ट्रातील निवडणुकीच्या मैदानात प्रचारासाठी उतरले असल्याचे चित्र दिसत आहे. पक्षाचे महाराष्ट्रातील पदाधिकारी सोबत, हैदराबाद, बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, येथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मैदानात प्रचारासाठी उतरले आहे.


महाराष्ट्रातील निवडणूक प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात लढणार असल्याने सर्व वरिष्ठ नेते मैदानात प्रचारा साठी उतरले आहे. 


याच अनुषंगाने रविवार दिनांक 11 जानेवरी रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दिन ओवैसी हे नगर येथे प्रचारासाठी मुकुंदनगर येथे सभा होणार आहे. एम आय एम पक्षाने अहमदनगर महानगर पालिकेत ६ जागांवर आपले उमेदवार दिले आहे.ज्याप्रकारे शहराचे राजकारण बदलत आहे. त्यावरून असे दिसते कि एम आय एम पक्ष महानगर पालिकेत खाते उघडून महापौर पदासाठी निर्णायक भूमिकेत असणार आहे.


प्रचाराची रणधुमाळी चालू झाल्यास एम आय एम चे राष्ट्रीय अध्यक्ष ओवैसी यांनी नगर येथे प्रचाराची सुरवात केल्याने या भागातील विरोधकांची झोप उडाल्याचे चित्र दिसत आहे.

प्रचाराचे शेवटच्या दिवशी पर्यंत पक्षाचे दिग्गज नेते चौक सभा आणि प्रचारासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचे माहिती जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी दिली.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने