Nagar Ncp | राष्ट्रवादी कडून प्रकाश भागानगरे यांची गटनेतेपदी निवड
नगर : दर्शक ।
नगर महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक प्रकाश भागानगरे यांची निवड. नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयात गटनोंदणी पूर्ण.
प्रकाश भागानगरे हे अहिल्यानगर महापालिकेत दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत.प्रकाश भागानगरे आणि सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नाशिक येथे उपस्थित
महापालिका निवडणुकीतील नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर बुधवारी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी नाशिक येथे स्वतंत्र गटनोंदणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे तर भाजपच्या गटनेतेपदी शारदा दिगंबर ढवण यांच्या नावावार शिक्कामोर्तब करण्यात आले.
नाशिक विभागीय आयुक्त यांच्यासमोर गट नोंदणी करण्यात आली.महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) 27 जागा मिळाल्या आहेत.
भाजपला 25 जागा मिळाल्या आहेत. विजयी उमेदवारांची नावे मंगळवारी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून गटनोंदणीसाठी हालचाली सुरु झाल्या होत्या.
बुधवारी सकाळी भाजप-राष्ट्रवादीचे नगरसेवक एकत्रितपणेच नाशिकला रवाना झाले. गट नोंदणीच्या काही वेळ अगोदर राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी प्रकाश भागानगरे आणि भाजपच्या गटनेतेपदी शारदा दिगंबर ढवण यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्रपणे गटनोंदणी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com