Top News

स्मरणशक्ती व आत्मविश्वासवाढीसाठी अबॅकस उपयुक्त : विशाल लाहोटी

 अमेझिंग अबॅकसचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

अमेझिंग अबॅकसचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात






अ.नगर (प्रतिनिधी) -


 मानसिक गणना आणि गणितीय समस्या सोडवण्याची क्षमता वाढवण्यासाठी अबॅकस ही एक पारंपारिक उपयुक्त पद्धत आहे. जलद व अचूक गणना करण्यासाठी व एकाग्रता वाढविण्यासाठी उपयोगी पडत असलेल्या अबॅकसचे महत्त्व अधोरेखित होते. या परीक्षेत यशस्वी झालेल्यांसाठी अमेझिंग अबॅकसने आयोजित केलेला गौरव सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरक ठरेल, असे प्रतिपादन ट्रेकॅम्पचे संस्थापक व मानसोपचार तज्ज्ञ विशाल लाहोटी यांनी केले.



शहरात नावाजलेल्या अमेझिंग अबॅकस संस्थेने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून लाहोटी बोलत होते. यश ग्रँड येथे झालेल्या या सोहळ्यास फॅशन डिझायनर मेघा लाहोटी, पत्रकार संदीप जाधव, अमेझिंग अबॅकसच्या संचालिका अश्विनी बल्लाळ व संचालक किरण बल्लाळ उपस्थित होते.



अमेझिंग अबॅकस बक्षीस वितरण कार्यक्रमात डिस्ट्रीक्ट लेव्हलवर बेसिक मॅथ कॉम्पिटिशन घेण्यात आली. त्यामध्ये 150 विद्यार्थी व पालकही सहभागी झाले होते. अर्पिता सोनटक्के, स्मिता जाधव आणि सृष्टी धोकरिया यांनी परीक्षण केले. त्यामध्ये प्रथम तिथे आणि उत्तेजनार्थ असे बक्षीस वितरण केले. अमेझिंग अबॅकसच्या बेसिक मॅथ स्पर्धेमध्ये आज्ञा कुलकर्णी, सानवी अग्रवाल, संतानिका लोंढे आणि अनुष्का दिनकर या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवले, तसेच सान्वी अग्रवाल, आर्वी शेवाळे विहान बजाज, सुकन्या चौधरी, मुग्धा विभूती, रिदिमा चिटमील, ओम झोरेकर, प्रथमेश शिंदे, अर्णव शिंदे, आरव माकिजा, मयंक भागवत, पूर्वल खरात, विनायक बोनगीरवार, वेदिका काळबांडे आदी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले.



या वेळी मेघा लाहोटी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना जिद्द व चिकाटी अंगी बाळगावी. अबॅकसचा वापर करून शैक्षणिक व व्यावसायिक जीवनात यशस्वी व्हावे.


अमेझिंग अबॅकसच्या संचालिका अश्विनी बल्लाळ म्हणाल्या की, अबॅकसमुळे समस्या सोडविण्याची क्षमता वाढते. अतिशय कमी खर्चामध्ये योग्य ज्ञान मुलापर्यंत पोहोचवायचा ऑटोकाट प्रयत्न अमेझिंग अबॅकस गेली तेरा वर्षांपासून करत आहे. संस्थेच्या महाराष्ट्रभर शाखा आहेत. देश विदेशामध्ये ऑनलाईन कॉम्पिटिशन घेण्यावर संस्थेचा नेहमीच भर असतो.



या वेळी किरण बल्लाळ, संदीप जाधव आदींनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी जयश्री कांबळे, कांचन दंडाळे, श्रद्धा देशमुख, डिंपल शर्मा, प्रज्ञा विभुती, इशांत बल्लाळ, दुर्वांक जाधव, सार्थक जगताप, स्वराज कंदलकर आदींनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक अश्विनी बल्लाळ यांनी केले. सूत्रसंचालन जयश्री कांबळे यांनी केले. किरण बल्लाळ यांनी आभार मानले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने