गार्गी रुपेश चव्हाण ला राष्ट्रीय स्पर्धेत सांघिक सुवर्ण पदक
नगर : दर्शक ।
इंफाळ मणिपूर येथे सुरू असलेल्या 19 वर्ष शालेय राष्ट्रीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत अहिल्यानगर ची स्टार खेळाडू गार्गी रुपेश चव्हाण ने रिकर्व्ह राऊंड प्रकारात सांघिक कामगिरी करत सांघिक सुवर्ण पदक पटकावले आहे.
अमरावती येथे डिसेंबर मध्ये झालेल्या शालेय राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत गार्गी चव्हाण हिने 1 कांस्य व 1 रजत पदक मिळवले होते हि स्पर्धा क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे,अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा अमरावती विभाग,जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय तसेच महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाली होती त्यामुळे तिची निवड झाली होती.
नगरची रहिवासी व सध्या इ.12 वी मध्ये दादासाहेब घाडगे पाटील विद्यालय इथे शिक्षण घेत असलेली गार्गी चव्हाण हिने इं
लहान पणापासून तिला क्रीडा क्षेत्राची आवड असून आजपर्यंत तिला अनेक राष्ट्रीय व राज्य स्तरावर पदके मिळवली असून राज्य मिनी ऑलंपिक मध्ये सुवर्ण पदक मिळवले आहे. तिला नगरचे अभिजित व शुभांगी दळवी याचे कडे प्रशिक्षण घेत आहे व त्यांचे मार्गदर्शन आहे.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com