Top News

Ganesh Jayanti | गणेश जयंतीनिमित्त श्री एकदंत गणेश मंडळातर्फे १०० गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

  Ganesh Jayanti | गणेश जयंतीनिमित्त श्री एकदंत गणेश मंडळातर्फे १०० गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

Ganesh Jayanti | गणेश जयंतीनिमित्त श्री एकदंत गणेश मंडळातर्फे १०० गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप     नगर : दर्शक ।  एकदंत कॉलनी, दातरंगे मळा,






नगर : दर्शक । 
एकदंत कॉलनी, दातरंगे मळा, अहिल्यानगर येथे श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने गणेश जयंतीच्या पावन पर्वानिमित्त नगर शहरातील १४ शाळांमधील १०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले. “एक पाऊल… गरजू विद्यार्थ्यांसाठी…” या सामाजिक संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.


       शाळा हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे भक्कम माध्यम आहे. शालेय शिक्षणातून विद्यार्थ्यांचा बौद्धिक, सामाजिक, मानसिक, शारीरिक तसेच नैतिक विकास घडून येतो. त्यामुळे प्रत्येक मुलाला शिक्षणाची समान संधी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र सध्याच्या महागाईच्या काळात शिक्षणही खर्चिक बनले असून अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने काही विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे.


      अशा गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी व त्यांना आधार मिळावा, या उदात्त उद्देशाने श्री एकदंत गणेश मंडळाने गणेश जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाला सामाजिकतेची जोड देत शालेय साहित्य (दप्तर) वाटपाचा उपक्रम आयोजित केला.



       या उपक्रमांतर्गत नगर शहरातील महंत पंडित सूच्चासिंग विद्यालय, मतिमंद मुलांची शाळा, मार्कंडेय विद्यालय (गांधी मैदान व श्रमिक नगर), महर्षी ग. ज. चीतांबर विद्यामंदिर (सबजेल चौक), शारदा मंदिर, संस्कृती कनोरे विद्यालय, कै. वि. ल. कुलकर्णी प्राथमिक शाळा, मनोहरलाल रामचंद सबलोक प्राथमिक विद्यालय, दादा चौधारी विद्यालय, सिताराम सारडा महाविद्यालय, प्रगत विद्यालय, बत्तीन पोट्ट्यांना प्राथमिक शाळा, महिला मंडळ बालक मंदिर आदी शाळांमधील १०० गरजू विद्यार्थ्यांना दप्तरांचे वाटप करण्यात आले.


       विशेष म्हणजे, श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने राबविण्यात येणारा दप्तर वाटप उपक्रम यंदा सहाव्या वर्षात असून आतापर्यंत एकूण ६०० गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप करण्यात आले आहे. मंडळाकडून दरवर्षी गणेश जयंती निमित्ताने  १०० गरजू विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात येते. याच गणेश जयंती निमित्ताने मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी, दंत तपासणी शिबिर घेण्यात आले असून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तपासणीही करण्यात आली. महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. यासोबतच मोठ्या उत्साहात हनुमान चालीसा पठण कार्यक्रमही भक्तिमय वातावरणात पार पडला.


      धार्मिकतेसोबत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. पालक व शिक्षकांनीही श्री एकदंत गणेश मंडळाच्या या सामाजिक उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.


      २२ जानेवारी २०२६  रोजी गणेश जयंती निमित्ताने अभिषेक, होम-हवन, सत्यनारायण महापूजा, नगर शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य शोभायात्रा तसेच भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री एकदंत गणेश मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशन यांनी केले तर आभार प्रदर्शन विनोदा बेत्ती यांनी मानले.

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने