Savedi | सावेडी उपनगरात हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जयंती उत्साहात साजरी
नगर : दर्शक ।
सावेडी उपनगर भागात स्वर्गीय हिंदुरुदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सिव्हील हडको येथील गणेश चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसैनिक व शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकार्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमात ओबीसी जिल्हाप्रमुख चंद्रकांत उर्फ काका शेळके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व, राष्ट्रप्रेम आणि मराठी अस्मितेसाठी आयुष्यभर लढा दिला. त्यांचे विचार हे समाजाला दिशा देणारे असून, आजच्या पिढीने ते समजून घेऊन आचरणात आणणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून सामाजिक बांधिलकी जपणारी चळवळ असल्याचे त्यांनी नमूद केले.
पुढे बोलताना काका शेळके म्हणाले, सावेडी उपनगरातील प्रत्येक घरात बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व आणि स्वाभिमानाचे विचार पोहोचवण्याचे काम शिवसैनिक करतील. संघटना अधिक मजबूत करून समाजहिताचे उपक्रम राबवले जातील. बाळासाहेबांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष अॅड. स्वाती जाधव, आमित खामकर, माजी नगरसेवक नितीन शेलार, नितीन खंडागळे, गोरख ढोमणे, नितीन फल्ले, सुनीता बहुले, सोनाली शिंदे, तृप्ती साळवे, नीता बर्वेयांच्यासह शिवसैनिक व महिला आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com