Karnataka Election: कर्नाटकात काँग्रेसचं पूर्ण बहुमताचं सरकार स्थापण होणार आहे. देशात बऱ्याच काळानंतर मिळालेल्या या दणदणीत आणि धडाकेबाज विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भूमिका मांडली. कर्नाटकात द्वेषाच्या नव्हे तर प्रेमाच्या जोरावर जिंकली असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं.
कर्नाटकमधील निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया दिली.
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव झाला आहे. भाजपने आपला पराभव मान्य केला आहे. राज्यात काँग्रेसने बहुमताचा आकडा पूर्ण केला आहे. काँग्रेसने उद्या तातडीने पक्षातील आमदारांची बैठकही बोलवली आहे. कर्नाटकात काँग्रेसने तब्बल १३५ जागांवर आघाडी घेतली आहे तर भाजपला केवळ ६६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालानंतर काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांनी मोजक्या शब्दांमध्ये आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, कर्नाटकामधील जनतेचा मी आभार मानतो. या जनतेने द्बेषाच्या राजकारणास नाकारले आहे आणि प्रेमाचे राजकारण स्वीकारले आहे, असा टोला मोदी यांचे नाव न घेता त्यांनी मारला. पुढे राहुल गांधी म्हणाले, की कर्नाटकामधील निवडणूक आम्ही लोकांच्या मुद्यावर लढलो. जनतेच्या प्रश्नाला महत्व दिले. या ठिकाणी जनतेने भांडवलशाहीचा पराभव केला आहे.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com