Top News

Allu Arjun | तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन मंजूर केला

Allu Arjun | तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन मंजूर केला 

Allu Arjun | तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन मंजूर केला




हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये ४ डिसेंबर रोजी  या चित्रपटाचा प्रिमियर शो ठेवण्यात आला होता. यासाठी अल्लू अर्जुन अचानक संध्या थिएटरमध्ये पोहोचल्यामुळे


 एकच गोंधळ उडाला. चाहत्यांनी त्याला जवळून पाहण्यासाठी धावाधाव केली. त्यामुळे चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून त्यात ३५ वर्षीय महिला रेवतीचा मृत्यू झाला होता. 


तसेच तिचा मुलगाही गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान याप्रकरणी अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल झाला असून आज त्याला अटक करण्यात आली तसेच त्याला १४ दिवसांची कोठडी सुनावल्यानंतर अल्लू अर्जुनने अटकेपासून सुटका मिळविण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली होती तेलंगणा उच्च न्यायालयाने अल्लू अर्जुनला जामीन मंजूर केला आहे 


दरम्यान आता या प्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. ज्या महिलेचा मृत्यू झाला. त्या महिलेचा पती भास्कर याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्याला अल्लू अर्जुनच्या 


अटकेची माहिती नाही आणि तो अभिनेत्याच्या विरोधातील सर्व तक्रारी मागे घेण्यास तयार आहे. 


माध्यमांशी बोलताना भास्करने सांगितले, “अल्लू अर्जुनविरोधातील तक्रार मागे घेण्यास मी तयार आहे. 


चेंगराचेंगरीच्या प्रकरणात अल्लू अर्जुनला अटक झाल्याची मला कल्पना नाही.


 चेंगराचेंगरीच्या घटनशी अल्लू अर्जुनचा काहीही संबंध नाही.”




 

पुष्पा २ चा ट्रेलर

Post a Comment

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

थोडे नवीन जरा जुने