तातडीने दखल न घेतल्यास राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अलतमश जरीवाला यांनी दिला आंदोलन छेडण्याच्या इशारा
नगर । दर्शक :
आपल्या वैभवशाली नगर शहराचे महत्त्वाचे ठिकाण व मुख्य बाजारपेठ असलेली गंज बाजार, मोची गल्ली व कापड बाजार येथे ड्रेनेजच्या पाण्याने सगळीकडे दुर्गंधी पाणी पसरल्यामुळे येतील येणाऱ्या नागरिक, व्यापारी व दुकानदारांना होतोय त्रास.
गंज बाजार येथे ड्रेनेजची लाईन तुडुंब भरल्याने व महानगरपालिकेचे कर्मचाऱ्यांना तेथे ड्रेनेजच्या झाकणाच्या अंदाज नसल्यामुळे तेथे खोदले गेलेला खड्ड्यातून येतोय घाण पाणी बाहेर, तो पाणी वाहत-वाहत गंज बाजार येथून मोची गल्लीच्या दिशेने येऊन थेट कापड बाजार व घास गल्ली पर्यंत जातोय.
या घाण पाणी मुळे बाजारपेठ मधील व्यापारी व दुकानदार या घाण पाण्याच्या वासाने त्रस्त झालेत, यामुळे त्यांना मोठ्या आजाराला सामोरे जाण्याची शक्यता याला आपण नाकारू शकत नाही. आपणास कळकळीची व नम्र विनंती आहे की आपण तातडीने याची दखल घेऊन येथील नागरिकांना, व्यापारी व्यापारी वर्ग व दुकानदारांना दिलासा द्यावा अन्यथा महापालिकेत तीव्र आंदोलन करणार याची आपण दखल घ्यावी असा इशारा राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष अलतमश जरीवाला यांनी यावेळी दिला.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com