भाग्योदय विद्यालयात डॉ. सुनिल गंधे यांचे व्यक्तिमत्व विकासावर व्याख्यान
नगर - आजच्या काळात शालेय अवस्थेपासूनच जर विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व शिस्त मिळाली तर भविष्यात विद्यार्थी कधीही बिघडू शकत नाही. शाळा आहे त्याचं मुख्य संस्कार केंद्र आहे. शालेय अवस्थेत विद्यार्थ्यांनी वेळ, नियम, शिस्त, आहार दिनचर्या, अभ्यास या पंचसूत्रीचा अभ्यास करून आपले व्यक्तिमत्व घडवला पाहिजे,वर्षभर राबवणार्या विविध शालेय उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला पाहिजे, की ज्यामुळे भविष्यात येणार्या अनेक परीक्षा, अनेक संकट, समस्या यावर विद्यार्थी मात करू शकतो, असे प्रतिपादन डॉ.सुनिल गंधे यांनी कले.
केडगांव येथील भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात व्यक्तिमत्व विकासावर प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त सरपंच डॉ. सुनील गंधे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.गंधे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासावृत्ती वाढीस लागली पाहिजे. विद्यार्थ्यांनी प्रत्येक घटनेबद्दल विषयाबद्दल शिक्षकांना प्रश्न विचारले पाहिजेत, त्यातून त्यांची संशोधनवृत्ती वाढीस लागते, विद्यार्थ्यांनी शाळेत येणार आपला डबा त्याच्यामध्ये असणारा आहार यामध्ये बेकरी प्रॉडक्ट आणि फास्ट फूड यांचा समावेश नसावा, की ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता जाणवते.
विद्यार्थी अशक्त बनतात विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास होत नाही, परिणामी विद्यार्थी अभ्यासामध्ये मागे पडतात. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आहारामध्ये आपल्या भारतीय परिसरातील मिळणारा भाजीपाला कडधान्य याचा जास्तीत जास्त वापर करावा. तसेच विद्यार्थ्यांनी आहारात शाकाहाराचा वापर करावा, त्यामुळे विद्यार्थ्यांची बुद्धी तल्लक, तेज आणि शार्प बनते.
विद्यार्थ्यांना आळस येत नाही व अभ्यासात विद्यार्थी हुशार होतात. विद्यार्थ्यांनी आपल्या दिनचर्यामध्ये सकाळी लवकर उठावे, कोमट पाणी प्यावे दररोज न चुकता नाश्ता करावा आई-वडिलांचे दर्शन घ्यावे. विद्यालयात आल्यावर आपल्या विद्यालयाचे दर्शन घ्यावे, अशा विद्यार्थ्यांना भविष्यात कधीही काही कमी पडणार नाही. असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राध्यापक एकनाथ होले यांनी विद्यालयांमध्ये विविध विषयावर विविध तज्ञ व मार्गदर्शकांचे व्याख्यान आयोजित केले जातात. ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुजलशीलता जिज्ञाशीवृत्ती आणि त्याचे व्यक्तिमत्त्व सर्वगुण संपन्न बनेल. येणार्या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना सर्व परीक्षेचा अनुभव मिळावा, हा हेतू विद्यालयाचा असतो. डॉ. सुनील गंधे हे अनेक आंतरराष्ट्रीय देशात फिरून त्याचा अनुभव घेऊन आले. तसेच अनेक सर्व रोग निदान शिबिर आयोजित केलेले आहेत सामुदायिक विवाह सोहळे आयोजित करून प्राणायाम व योग शिबिर सुद्धा ते भरवतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याकडून प्रेरणा मिळावी, म्हणून त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले.
प्राचार्य ज्ञानदेव बेरड यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करून विद्यालयांमध्ये वर्षभर व्यक्तिमत्व विकासावर तसेच अनेक सहशालेय कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवले जातात. इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा जवळ आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बोर्डपरीक्षानंतर विद्यार्थ्यांना अनेक स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. त्यासाठी भाग्योदय विद्यालय विद्यालयांमध्ये इयत्ता दहावी बारावी विद्यार्थ्यांकरता स्पर्धा परीक्षांचा सराव करून घेतला जातो. तसेच अनेक स्पर्धा परीक्षा अनेक स्पर्धा परीक्षा पुस्तकांचं ग्रंथालयामध्ये आणून विद्यार्थ्यांनी या स्पर्धा परीक्षांचे वाचन करून वाचन संस्कृती वाडीस लावावी व विद्यार्थ्यांनी मोबाईलचा कमीत कमी वापर करावा.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक कोतकर बाबासाहेब, सोपानराव तोडमल,साहेबराव कार्ले, कदम गोविंद, गोरक्ष कांडेकर, दत्तात्रय पांडुळे, धनंजय बारगळ, आदिनाथ दुबे, संतोष काकडे तसेच शिक्षकेतर कर्मचारी गायकवाड गणेश, बाळासाहेब कावरे, सुधाकर गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com